मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
वाशिम वाशिम जिल्ह्यातील आडोळी गाव सर्वात मोठे असून शेतकऱ्यांच्या हितासाठी पादन रस्ते होणे गरजेचे आहे. याबाबत अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व सुखासाठी पांदन रस्ते करणे गरजेचे आहे. याबाबत अनेक आवाज शेतकऱ्यांनी उठवले असल्याचे समजते.
परंतु लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नसल्याने आज रोजी या रस्त्यावरून जाता येत नाही. या गावात जवळपास सात पांदन रस्ते आहेत, परंतु एकही पांदण रस्ता पूर्ण झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी निद्रास्त अवस्थेत असल्याची शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली असून त्याची दिशाभूल होत असल्याचे ते बोलत आहेत
केवळ मतदान असते तेव्हा शेतकरी दिसतात. मात्र त्यांची दुरावस्था खुपचं वाईट झाली आहे. शेतीसाठी असलेले रस्ते या कामाकडे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे बोलतात, याबाबत स्वाभिमानी शेतकारी संघटनेचे विदर्भ सचिव राम इढोळे, म्हणतात जर या शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष्य दिले नाही. तर साभिमानि शेतकरी संघटना लवकर च मोठे आंदोलन करेल लोकप्रतिनिधींना कधि लक्ष्य घालणार आडोळि गावामधे असा सवाल गांव करि करत आहेत.