नरखेड – अतुल दंढारे
धारणी तालुक्यातील टिंगऱ्या येथे अंत्योदय मिशन देवग्राम तह.नरखेड जिल्हा नागपूर द्वारा संचालित जीवन विकास कनिष्ठ महा. दहेंडा वतीने रा से योजनेचे विशेष शिबिराचा समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्माचे अध्यक्ष स्थानी कनिष्ठ महा.चे प्राचार्य मा. राजेन्द्र अर्मळ हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री देविदासजी आरोटकर पोलीस पाटील ,श्री राहूलजी पटेल सरपंच श्री घनश्यामजी धूर्वे उपसरपंच श्री बाबुलालजी जावरकर (शिक्षण विस्तार अधिकारी धारणी )श्री बाबारावजी भिलावेकर ग्रा. प.सदस्य श्री भारतभाऊ कासदेकर,श्री गजेंद्र सवई,श्री खेमचद आरोटकर श्री उदयसिंग चौहान प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा सुरवातीला वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन पाहुण्याचा हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रा से यो चा विविध कार्यक्रमा बद्दल उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.निलेश पुंडलिकराव विरखडे यांनी तर सूत्र संचालन प्रा.मंगेश मधुकरराव निंबुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दयाराम सेलुकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री पराग गिरी,श्री विशाल पटेल,श्री सचिन भिलावेकर श्री अभिषेक धिकार श्री राजू भिलावेकर श्री.विलास भोंगाडे श्री.किशोर चौहान श्री सुभाष पाईकराव श्री किसनाजी सोनोने कु. भाग्यश्री जांभेकर कू.रेणुका ठाकरे ,नितीन जावरकर,रणजीत पटेल,शुभम भालेराव,रोहित धुर्वे यांनी परिश्रम घेतले.