गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) तिरोडा तालुक्यातील आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून गावातील लोकांना लागणारे दाखले ऑनलाईन व ऑफलाईन सर्व कामकाज सध्या बंद असून याबाबतचे निवेदन तिरोडा गटविकास अधिकारी श्री लिल्हारे यांना ग्राम पंचायत संगणक परीचालक संगटणा तालुका तिरोडा यांचे कडून देण्यात आले.
सविस्तर असे की गेल्या तेरा वर्षापासून गावातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक यांची नियुक्ती CSC -SPV या कंपनी मार्फत करण्यात आलेली असून त्यांना ग्रामपंचायत मधून बारा हजार रुपये प्रत्येक महिन्याना या प्रमाणे ववर्षाची अग्रिम रक्कम जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येतात परंतु त्या संगणक परिचालक यांना फक्त 6930/- एवढेच मानधन देण्यात येते ते पण वेळेवर मिळत नाही एवढ्या महागाईच्या काळात सर्वसामान्य संगणक परीचालकांनी एवढ्या कमी मानधनात आपला पंच कसा चालवावा यासाठी शासनाने यावलकर समितीच्या आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देण्यात यावा व आकृतीबांधला वेळ लागत असेल तर किमान वेतन वीस हजार रुपये देण्याची मागणी या स्तरावर करण्यात येत आहे संपूर्ण राज्यभर आंदोलनाचा इशारा करण्यात येत आहे. यावेळी तिरोडा तालुका अध्यक्ष प्रकाश पटले, टोलिराम नेरकर,उमेश मेश्राम,घनेंद्र सूर्यवंशी,शैलेश नागपुरे,हेमंत उके,जितेंद्र उईके प्रामुख्याने उपस्थित होते.