राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा असून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपात दाखल होणार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली सोबतच अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याचीही माहिती दिली आहे. तर येणाऱ्या दोनतीन दिवसात ठाकरे विरुद्ध शिंदे यांचा निकाल येणार? त्यामुळेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सोहळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा महत्त्वाचा विषय असल्याने त्यावरूनच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
न्यू इंडियन एक्स्प्रेसने असा दावा केला आहे की, उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवेल, असे गृहित धरून शिदेंच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागू शकते, यावर अजित पवार यांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा फेटाळून लावला असून केवळ हा अफवांचा बाजार असल्याचे म्हणाले आहे. मात्र अजित पवार यांनी आज यांनी आपल्या आमदारांना विधान भवनात एकत्रित करून त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे.