Monday, December 23, 2024
Homeराजकीयभक्तांची चॉईस किती फडतूस…सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्टवर जोरदार चर्चा...

भक्तांची चॉईस किती फडतूस…सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्टवर जोरदार चर्चा…

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फडतूस विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांवर अशा भाषेत टीका केल्यास, तुम्हाला आम्ही सोडणार नाही, असा धमकीवजा इशारा महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूक वर पोस्ट करीत भक्तांचा चांगलाच समाचार घेतला…काय म्हणाल्या सुषमा अंधारे?….

छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड लोढा कोशारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत..

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत…

क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत…

परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत…

महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत…

संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल. त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत

पण #फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले…

सारांश : ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल ?…असा फेसबूक पोस्टकरून चिमटा काढला….

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: