रामटेक – राजू कापसे
जि. प.प्राथ.शाळा शिवनी येथे 1 सप्टेंबर 2023 रोजी रक्षाबंधन सणानिमित्ताने का आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये मुलांनी बहिणीला व वृक्षांना राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेला परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे.
रक्षा म्हणजेच संरक्षण आणि बंधन म्हणजे बंधन. राखी सामान्यतः बहिणी भावाला बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावांच्या प्रगतीसाठी मनोकामना व्यक्त करते आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ आपल्या बहिणींना काही भेटवस्तू देतो. भारतीय परंपरेनुसार अशा पद्धतीने हा सन साजरा केला जातो.
परंतु जिल्हा परिषद शाळा शिवनी येथे निलेश नन्नावरे यांच्या संकल्पनेतून एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये जि. प.प्राथमिक शाळेच्या तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थिनींना व शाळेतील कदंब, सीताफळ, जांभुळ यासारख्या वृक्षांना राखी बांधली.
21 व्या शतकातील बहिणींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी भाऊरायावर अवलंबून राहणे म्हणजे स्त्रीने स्वतःला असक्षम समजण्यासारखे आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे तिला संरक्षणाचे वचन देऊन ती असक्षम असल्याची दरवर्षी जाणीव करून द्यायची.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम दर्जाचे स्थान देऊन तिला कायम ऐतिहासिक गुलामगिरीत राहायला भाग पाडले आहे. या सामाजिक धारणेत बदल व्हायला हवेत. मातृसत्ताक संस्कृतीत स्त्रीला उच्च दर्जाचे स्थान आहे. यानुसार स्त्री हीच कुटुंबसंस्थेचा व समाज व्यवस्थेचा प्रमुख कणा असतो.
म्हणून पुरुष असलेल्या भावानेच स्त्री असलेल्या बहिणीकडून स्वतःच्या व वृक्षांच्या रक्षणाचे वचन घ्यावे. भावाने स्वतःच्या बहिणीच्या सामाजिक आर्थिक,शैक्षणिक प्रगतीसाठी व वृक्ष जगावे म्हणून प्रकृतीकडे मनोकामना व्यक्त करावी. झाडाचे रक्षण करन्याची प्रतिज्ञा घेऊन बहिणीने भावाला भेटवस्तू द्यावी.
तिचं स्वातंत्र्य मान्य करावं. हा परिवर्तनशील विचार ठेवून बहिणीला व वृक्षाला रक्षाबंधन करून हा उत्सव जिल्हा परिषद शाळेत साजरा करण्यात आला. “फक्त मुलगाच मुलीचे म्हणजेच बहिणीचे रक्षण करू शकतो, असा आजपर्यंतचा सामाजिक समज आहे. बहीण आणि भाऊ एकमेकानची ताकत असतात. दोघेही एकमेकांची काळजी करतात. मग भावानीच बहिणीला राखी बांधणे यात काय गैर आहे?.
भावनेच बहिणीला कमजोर समजून तिचे रक्षण का करावे? भावाने सुद्धा सक्षम समजून बहिणीला रक्षणाची जबाबदारी द्यावी. तिला स्वतंत्र द्यावे आणि मुक्तपणे जगू द्यावे.झाडे आणि वनस्पती मानवजातीला जीवन देत आहेत कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या वातावरणात स्वतःला अनुकूल ठेवत आहेत म्हणून पृथ्वीला वाचविण्यासाठी राखीच्या दिवशी झाडांना राखी बांधून आपण सर्वांनी झाडाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करू _निलेश ननावरे, शिक्षक जि.प.शाळा शिवणी