Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसबरीमाला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार ४० फूट खोल दरीत कोसळली...आठ भाविकांचा दुर्दैवी...

सबरीमाला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार ४० फूट खोल दरीत कोसळली…आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू…

न्युज डेस्क – तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कुमुली हिल पास येथे कार ४० फूट खोल दरीत कोसळून आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व सबरीमाला येथे दर्शनासाठी गेले होते, यातील दोन जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात कसा झाला
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, डोंगरी रस्त्यावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून हे सर्व आंदिपट्टी येथील रहिवासी आहेत. ते सबरीमालाहून परतत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: