राजेंद्र मोहोड विशेष प्र. मूर्तिजापूर
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच अमरावती विधानसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. अगोदर हि जागा भाजपा सुटणार असल्याचे बोलले जात होते, नंतर विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनाच मिळणार असल्याचे सांगितले जात होते मात्र आता हि जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याचे समजते. तर उद्या रविवारी या बाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्राचे मुख्यसमन्व्यक नानकराम नेभनानी यांची अमरावती विधानसभे करिता शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाले असून.मुंबई येथे रविवार ला शिवसेना शिंदे गटा कडून नानकराम नेभनानी यांच्या नावाची उमेदवारी मिळण्याची घोषणा होण्याचे संकेत आहे.अमरावती विधानसभातील नागरिकांची मागणी असल्यामुळे शिवसेना शिंदे गटा मध्ये नानकराम नेभणांनी यांचे आघाडी वर नाव असून नागरिकांच्या मागणी नुसार व शिवसेना पदाधिकारी व इतर नागरिकांकडून मागणी होत असल्यामुळे व वेळ पडली तर अमरावती विधानसभे मध्ये मैत्रीपुर्ण लडत सुद्धा होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे…!!