Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीआलेगाव बाभूळगाव रस्त्यावर द बर्निंग कार...

आलेगाव बाभूळगाव रस्त्यावर द बर्निंग कार…

आलेगाव बाभूळगाव रस्त्यावरील घटना…

पातूर – निशांत गवई

पातूर वरून आलेगाव कडे येणाऱ्या बलेनो चारचाकी गाडीला वसंतराव नाईक विद्यालय नजीक रस्त्यावर अच्यानक आग लागून भस्म होण्याची घटना दि १ जानेवारी रोजी दुपारी १-२५ वा घडली. पातूर येथील रहिवाशी गुलाबराव वानखडे हे आपल्या परिवारासह,आलेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस मेजर महादेव इंगळे यांच्या मुलीच्या कुंकवाच्या कार्यक्रमा मध्ये पातूर वरून आलेगावा कडे येत असताना वसंतराव नाईक विद्यालयाच्या नजीक एम,एच,30 बी,एल 8151 बलेनो कंपनीच्या चालू गाडीने दि 1 रोजी दुपारी १-२५ वा दरम्यान अच्यानक पेट घेतला.

सदरची बाब गाडी चालकांच्या लक्षात येताच गाडीतील पाच जनांनी गाडी सोडून बाहेर पळ काढला.अनेक वाहन चालकांनी माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका मोठा असल्याने ते आग विझविणे शक्य झाले नाही.सदर घटने मध्ये कुणालाही इजा अथवा जीवित हानी घडली नाही.आलेगाव येथील आठवडी बाजार असल्या कारणाने रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची रेलचेल होती.

त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी उसळली होतीत्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.सदर घटना पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असली तरी आलेगाव पोलीस चौकीचे पोलीस नाईक दादाराव आढाव यांनी स्थानिक पत्रकारांच्या माहिती नुसार घटना स्थळ गाठून गर्दीला हटवून वाहतूक रस्ता मोकळा करून दिला.तसेच पातूर येथील अग्निशामक दलाच्या गाडीने धाव घेऊन ऑपरेटर प्रल्हाद वानखडे,फायरमन आसिफखान मजरखान सै अशपाक आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: