Tuesday, December 24, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर शहरात तुरुंगवास भोगून आलेल्या इसमाची निर्घृण हत्या..!

मूर्तिजापूर शहरात तुरुंगवास भोगून आलेल्या इसमाची निर्घृण हत्या..!

मूर्तिजापूर शहरातील तोलाराम भगतसिंग चौकात हत्येचा प्रकणात तुरुंगवास भोगून आलेल्या इसमाच्या निर्घृण हत्येनं शहर हादरले. सुरेश देशमुख वय अंदाजे 52 वर्ष, असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. हत्या झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. अज्ञात मारेकरांनी धारदार तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली होती, फरार आरोपीचा मूर्तिजापूर शहर पोलीस शोध घेतला असून त्याला नुकतीच अटक करण्यात आली असून पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव खालिद शेख वय 25 रा जुनी वस्ती असल्याचे समजते सदर हत्या मृतकच्या जाचाला कंटाळून झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शहरातील नगरपालिका वाचनालयाच्या पाठीमागे राहत असलेल्या सुरेश देशमुख यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे समोर आले असून देशमुख हे एका हत्या प्रकरणात तुरुंगवास भोगला असून काही दिवसांपूर्वी त्यांची सुटका झाली होती. सुटका झालेला सुरेश हा तोलाराम चौकातील रंगदारी करीत असल्याचे समोर आले आहे. यातच सुरेशची हत्या झाल्याचे समजते.

सुरेश यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवले असून, या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: