Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayViral News | नवरदेव तयार होण्यासाठी गेला 'सलून'मध्ये…अन तो न परतल्याने लहान...

Viral News | नवरदेव तयार होण्यासाठी गेला ‘सलून’मध्ये…अन तो न परतल्याने लहान भावाने उरकून घेतले लग्न…

उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून लग्नाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे एक वर मिरवणुकीच्या दिवशी ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये गेला होता, मात्र परत आला नाही. त्याला खूप फोन केलेत. शोधाशोधही करण्यात आली. पण तो सापडलाच नाही. अशा स्थितीत त्याच्या धाकट्या भावाला वऱ्हाडी म्हणून घेऊन गेले. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तरुणाचे दुसऱ्या मुलीवर प्रेम होते आणि त्यामुळे त्याला लग्न करण्याची इच्छा नव्हती.

‘आज तक’ ने दिलेल्या वृत्तानुसार, बिलसांडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातून मिरवणूक बरेलीतील फतेहगंजपर्यंत जाणार होती. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. सर्वजण मिरवणुकीत जाण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र शेव्हिंग, केस कलर आणि फेशियलच्या नावाखाली वराने घर सोडले. जेव्हा सकाळ झाली आणि तो परत आला नाही तेव्हा सर्वजण काळजीत पडले. त्याला फोन केला असता मोबाईल स्वीच ऑफ येत होता. रात्रीचे ९ वाजून गेले होते. वधूच्या बाजूनेही वराच्या फरार झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. मुलाच्या धाकट्या भावाला नवरदेव बनवायचे ठरले. वधूनेही याला होकार दिला. मग काय, ठरल्याप्रमाणे लग्न झाले. फक्त वर बदलला आहे.

याप्रकरणी मुलीची बाजू सांगते की, वराला जायचे असते तर ते साक्षगंधाच्या दिवशीच (२८ जानेवारी) गेले असते. मिरवणुकीच्या दिवशी का गेला होतास? दुसरीकडे, वडिलांना आपल्या मुलाची खूप काळजी होती, म्हणून त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर फरार झालेल्या वराचा मोबाईल पाळत ठेवला असता त्याचे शेवटचे लोकेशन बमरोली रोड दाखवत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: