Monday, December 23, 2024
Homeराज्य'द ब्रेड ऑफ लाईफ' ने जिंकली रसिकांची मने...

‘द ब्रेड ऑफ लाईफ’ ने जिंकली रसिकांची मने…

रामटेक – राजु कापसे

‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत ‘केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग, नवी दिल्ली आयोजित ‘मेराकी’ परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली)दिग्दर्शीत ‘द ब्रेड ऑफ लाईफ :डॉ. पांडुरंग खानखोजे, द अनसंग हिरो’या नाटकाचे शुक्रवार, दिनांक 04 ऑगस्ट 2023 येथे दुपारी 3 वाजता समर्थ शिक्षण मंडळाच्या स्व. घनश्यामराव तात्याजी सांस्कृतिक सभागृह, रामटेक येथे सादरीकरण करण्यात आले होते. या प्रयोगाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानखोजे यांचे भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात सर्वात मोठे योगदान आहे, त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे, तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या भारतीय लोकांची देशासाठी मदत आणण्याची महत्वाची भूमिका बजावली. ‘द ब्रेड ऑफ लाईफ- डॉ खानखोजे: द अनसंग हिरो’ हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारित होते.

या नाटकामुळे आम्हाला अपरिचित क्रांतिकारक डॉ.खानखोजेंबदल माहिती मिळाली’अशा व इतर अनेक प्रतिक्रिया नाट्यरसिकांनी व्यक्त केल्या. या नाटकात कलावंत पुष्पक भट, हर्षवर्धन देशमुख, कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेड़े, शुभम गौतम, अविनाश अरोरा, कुणाल टोंगे, कुणाल मेश्राम, सिद्धांत पटेल, चैतन्य दुबे, अनुक्षा आर्गे, महक त्रिपाठी, निश्चय बेलानी, बुद्धांश, शुभम शेंडे, मयूर मानकर, अंकित ठाकरे यांची लक्षवेधी भूमिका होती

या प्रयोगासाठी प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे, संगीत संयोजन नारायण, संगीत संचालन निकीता ढाकुलकर,रंगभूषा व वेशभूषा ऋतुजा वानखेडे , नेपथ्य अलियर, अंकित ठाकरे, प्रबंध व समन्वयन हितेश यादव यांचे तर कला सहायक रितेश, सिनोग्राफी अलियर यांचे लाभले.
बऱ्याच वर्षानंतर रामटेक शहरात एका उत्तम आणि दर्जेदार नाटकाचा प्रयोग अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमासाठी शिक्षण मंडळाचे अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: