Monday, December 23, 2024
Homeव्यापारद बॉडी शॉपची ब्रिटीश रोझ श्रेणी...

द बॉडी शॉपची ब्रिटीश रोझ श्रेणी…

ब्रिटनमध्ये स्थापित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय, एथिकल ब्युटी ब्रॅण्ड द बॉडी शॉपच्या ब्रिटीश रोझ श्रेणीमध्ये गुलाबाचा अर्क, कोरफड आणि त्यांच्या बीस्पोक कम्युनिटी फेअर ट्रेड प्रोग्रामच्या माध्यमातून स्रोत मिळवलेल्या इतर पोटेण्ट घटकांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी, हायड्रेटेड व कोमल बनते.

हे घटक त्वचेला परिपूर्ण पोषण व केअर देतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही श्रेणी प्रत्येक वयोगटासाठी अनुकूल आहे. द बॉडी शॉपच्या ब्रिटीश रोझ श्रेणीमध्ये ब्रिटीश रोझ ईओ डी टॉइलेट, ब्रिटीश रोझ स्क्रब, ब्रिटीश रोझ एक्सफोलिएटिंग सोप, ब्रिटीश रोझ फ्रेश प्लम्पिंग मास्क, ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट, ब्रिटीश रोझ हँड क्रीम, ब्रिटीश रोझ शॉवर जेल, ब्रिटीश रोझ शॉवर स्क्रब आदी उत्पादनांचा समावेश आहे.

ब्रिटीश रोझ ईओ डी टॉइलेट: ९१ टक्के मूळ नैसर्गिक घटकांसह तयार करण्यात आलेले द बॉडी शॉपचे ब्रिटीश रोझ ईओ डी टॉइलेट तुम्हाला फुललेल्या बागेसारखा सुगंध देईल. फ्लोरल सेंट द वेगन सोसायटीने प्रमाणित केला आहे आणि ४२ टक्के पुनर्चक्रणीय काचेपासून बनवण्यात आलेल्या रिसायक्लेबल बॉटलमध्ये येतो. १०० बॉटलसाठी १,५९५ रूपये किंमत असलेला सेंट दीर्घकाळापर्यंत राहतो आणि त्वचेला कोरडे करत नाही. तुम्हाला फक्त मानेवर व इतर भागांवर हा सेंट शिंपडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज असाल.

ब्रिटीश रोझ स्क्रब: मृत पेशी सौम्यपणे दूर करण्यासाठी आणि त्वचेला कोमलता देण्यासाठी निर्माण करण्यात आलेले बॉडी एक्सफोलिएटर द बॉडी शॉपचे ब्रिटीश रोझ बॉडी स्क्रब त्वचेला गुलाबाची चमक देते. फुलांचा सुगंध असलेला हा स्क्रब ब्रॅण्डच्या कम्युनिटी फेअर ट्रेड गुलाबाच्या अर्कांपासून तयार करण्यात आला आहे आणि द वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे. हा स्क्रब ५० मिली व २५० मिली या दोन आकारमानांमध्ये येतो, ज्यांची किंमत अनुक्रमे ४४५ रूपये व १,३४५ रूपये आहे.

ब्रिटीश रोझ एक्सफोलिएटिंग सोप: अस्सल गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या नॉन-ड्राइंग साबण ब्रिटीश रोझ एक्सफोलिएटिंग सोप त्वचा स्वच्छ व एक्सफोलिएट करतो, ज्यामुळे त्वचा नितळ, हायड्रेटेड व कोमल बनते. शिया बटर व गुलाबाचा अर्क असलेला या साबण संपन्न, क्रीमी लेथर तयार करतो, जे तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले क्लीन्सिंग व हायड्रेशन देईल. १०० ग्रॅम साबणाची किंमत ४९५ रूपये आहे आणि पूर्णत: वेगन (शाकाहारी) आहे.

ब्रिटीश रोझ फ्रेश प्लम्पिंग मास्क: युरोपियन आंघोळी करण्याच्या प्रथेमधून प्रेरित द बॉडी शॉपच्या ब्रिटीश रोझ फ्रेश प्लम्पिंग जेल फेस मास्कमध्ये हाताने निवडलेल्या ब्रिटीश रोझेजमधील रीअल गुलाबाच्या पाकळ्या, रोझहिप ऑईल व ऑर्गनिक कम्युनिटी फेअर ट्रेड अॅलो वेराने युक्त आहे. पॅरोबन्स, पॅराफिन व मिनरल ऑईल्स नसलेला हा मास्क १०० टक्के वीगन आहे आणि तुमच्या त्वचेला तेजस्वी व कोमल करेल. हा मास्क दोन आकारांमध्ये येतो – १५ मिली टब, ज्याची किंमत ६४५ रूपये आहे आणि ७५ मिली टब, ज्याची किंमत २,२९५ रूपये आहे.

ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट: विशेषत: उकाड्याच्या उन्हाळ्यामध्ये त्वचेला योग्य पोषण देणाऱ्या क्रीम्सच्या बाबतीत कधी-कधी संघर्ष करावा लागतो. द बॉडी शॉपचा ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट वजनाने हलका फॉर्म्युला आहे, जो त्वचेमध्ये त्वरित शोषला जातो आणि जवळपास ४८ तासांपर्यंत हायड्रेशन देतो.

तेजस्वी, पोषित त्वचेसाठी आंघोळ केल्यानंतर त्वरित ओलसर त्वचेवर जेल क्रीमचा वापर करणे उत्तम आहे. १०० टक्के वीगन बॉडी योगर्ट इंग्लंडमधील गुलाबाच्या अर्कांसह तयार करण्यात आले आहे आणि त्यामध्ये स्पेनमधील कम्युनिटी फेअर ट्रेड ऑर्गनिक आल्मंड मिल्क व ऑईल आहे, जे तुम्हाला गुलाबांच्या पुष्पगुच्छासारखा सुगंध देईल. २०० मिली टबची किंमत ९९५ रूपये आहे आणि रिसायकल करता येऊ शकते.

ब्रिटीश रोझ हँड क्रीम: आपण करणाऱ्या दैनंदिन कामामध्ये जवळपास हातांचा वापर अधिक होतो, जसे आपण दिवसातून अनेक वेळा हात धुतो. यामुळे आपल्या हातावरील त्वचा कोरडी व खडबडीत होते.

द बॉडी शॉपची ब्रिटीश रोझ हँड क्रीम हातांना दिवसभर गुलाबाचा सुगंध असलेले हायड्रेशन देते. क्रीममधील नॉन-ग्रीसी, वजनाने हलके फॉर्म्युलेशन त्वचेमध्ये त्वरित शोषले जाते, ज्यामुळे तुमचे हात कोमल व मुलायम बनतात. हँड क्रीम दोन आकारमानांमध्ये येते – ३० मिली ट्यूब, किंमत ३९५ रूपये आणि १०० मिली ट्यूब, किंमत ९९५ रूपये.

ब्रिटीश रोझ शॉवर जेल: ९२ टक्के मूळ नैसर्गिक घटकांसह तयार करण्यात आलेले ब्रिटीश रोझ शॉवर जेल तुम्हाला शुद्धतेचा अनुभव देईल. गुलाबाचा अर्क आणि मेक्सिकोमधील कम्युनिटी फेअर ट्रेड अॅलो वेरापासून तयार करण्यात आलेल्या शॉवर जेलमध्ये मस्क व बर्गामोट आहे, जे तुम्हाला उत्तम सुगंध देईल.

हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे आणि संपन्न, बबली फोम तयार करते, जे तुमची त्वचा हायड्रेटेड राहण्याची खात्री देईल. शॉवर जेल ज्या बॉटलमध्ये येते ती बॉटल १०० टक्के रिसायकल केलेल्या प्लास्टिकसह तयार करण्यात आली आहे आणि उत्पादन द वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे. शॉवर जेल २ आकारमानांमध्ये उपलब्ध आहे – ६० मिली, किंमत २२५ रूपये आणि २५० मिली, किंमत ३९५ रूपये.

ब्रिटीश रोझ शॉवर स्क्रब: तुमच्या त्वचेला कोमल व टवटवीत बनवण्यासाठी मृत पेशी काढून टाकण्याकरिता तयार करण्यात आलेले द बॉडी शॉपचे ब्रिटीश रोझ शॉवर स्क्रब परिपूर्ण बॉडी एक्सफोलिएटर आहे. हे सामान्य त्वचेसाठी अनुकूल आहे आणि त्यामध्ये उत्साहवर्धक फुलांचा सुगंध आहे. द वीगन सोसायटीद्वारे प्रमाणित शॉवर स्क्रब त्वचेला कोरडे न बनवता गुलाबासारखी चमक देते. या स्क्रबची किंमत २०० मिली ट्यूबसाठी ९९५ रूपये आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: