Sunday, December 22, 2024
Homeव्यापारद बॉडी शॉपने स्किनकेअर श्रेणी लॉन्च केली...

द बॉडी शॉपने स्किनकेअर श्रेणी लॉन्च केली…

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ट्रान्सवर्सल स्किनकेअर

द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने ‘फ्लॉवर पॉवर’ला वास्तविक रूप देत त्याच्या उल्लेखनीय अॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणा-या एडलवाईस फ्लॉवरसह ट्रान्सव्हर्सल स्किनकेअर रेंज लॉन्च केली आहे. द बॉडी शॉपने एडलवाईसमध्ये सापडलेल्या शक्तिशाली नैसर्गिक संरक्षण प्रणालींना अधिक टिकाऊ आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या पॅकेजिंगमध्ये समाविष्ट केले आहे,

ज्यामधून ब्रॅण्डची “चेंजमेकिंग ब्युटी” कटिबद्धता पुन्हा दिसून आली आहे. व्हेगन प्रमाणित एडलवाईस श्रेणीमध्ये एडलवाईस डेली सीरम कॉन्सेंट्रेट, एडलवाईस आय सीरम, एडलवाईस सीरम कॉन्सन्ट्रेट शीट मास्क, एडलवाईस बाउंसी जेली मिस्ट, एडलवाईस लिक्विड पील, एडलवाईस क्लीनिंग कॉन्सन्ट्रेट आणि एडलवाईस इंटेन्स स्मूथिंग क्रीम यांचा समावेश आहे.

कोरडेपणा, खाज सुटणे, लालसरपणा, दाह, पुरळ, इत्यादींसारख्या आपल्या दैनंदिन त्वचेच्या समस्यांपैकी ८० टक्के समस्या प्रदूषण आणि धुळीमुळे उद्भवतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज, सुकलेली आणि थकलेली दिसते. अॅण्टीऑक्सिडण्ट्स असलेले एडलवाईस स्टेम सेल्स आणि एडलवाईस अर्क नैसर्गिक-उत्पत्तीच्या पेप्टाइड्ससह एकत्रित केले जातात, जे त्वचेचे बाह्य घटकांपासून संरक्षण करतात. बाजारपेठेतील बहुतेक पेप्टाइड्स कृत्रिम आहेत, तर द बॉडी शॉपचा नैसर्गिक मूळ पर्याय तांदळामधून स्रोत मिळवते.

द बॉडी शॉप इंडियाचे उपाध्‍यक्ष विशाल चतुर्वेदी म्हणाले, “आमच्यासाठी सौंदर्य म्हणजे स्वत:ची काळजी, स्वच्छता व संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा वेलनेस-आधारित दृष्टीकोन. शाश्वत, कार्यक्षम आणि नैतिक स्किनकेअर हे आमच्या विश्वासांना अधिक दृढ बनवते.

आमच्यासाठी उत्पादन व नवोन्मेष्कारी घटक ग्राहकांच्या गरजांबाबतच्या सखोल माहितींमधून निर्माण होतात. द बॉडी शॉपची एडलवाईस स्किनकेअर श्रेणी सर्व वयोगटातील व्यक्ती आणि त्वचा प्रकारांसाठी ट्रान्सवर्सल आहे. आम्‍ही नैसर्गिक मूळ घटकांनी युक्त नवीन नैतिकदृष्ट्या स्रोत मिळवलेले उत्पादन लॉन्च करण्यास उत्सुक आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: