Monday, December 23, 2024
Homeव्यापारद बॉडी शॉपचे आयकॉनिक ख्रिसमस कलेक्शन...

द बॉडी शॉपचे आयकॉनिक ख्रिसमस कलेक्शन…

पॅशनफ्रुट, वाइल्ड पाइन आणि स्पाइस्ड ऑरेंज श्रेणीचा समावेश 

द बॉडी शॉप या ब्रिटनस्थित आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने ख्रिसमससाठी बॉडी शॉप गिफ्ट सेट्सची अफलातून श्रेणी बाजारात आणली आहे. हॅण्ड क्रीमपासून शॉवर जेलपर्यंत आणि फेस मास्कपासून लिप बामपर्यंत अनेक उत्पादने वाइल्ड पाइन, पॅशनफ्रुट व स्पाइस्ड ऑरेंज या ३ लिमिटेड-एडिशन श्रेणींमध्ये बाजारात येत आहेत. तुम्हाला फिलर्सचा संग्रह करून ठेवायचा असेल, भेटवस्तू द्यायच्या असतील, सिक्रेट सँटा होऊन गिफ्ट द्यायचे असेल किंवा अगदी स्वत:साठीच काही हिवाळी खरेदी करायची असेल तर हे पर्याय उपयुक्त ठरतील.

यावर्षीच्या विशेष उत्सवी सुवासांमध्ये ऑरेंजेस, स्टॉकिग्ज स्पाइस्ड ऑरेंज व पाइन आणि डिव्हाइन वाइल्ड पाइन यांचा समावेश आहे, हे सुवास आर्द्र घटकांनी समृद्ध करण्यात आले आहेत, यात रसाळ संत्र्याचा सुवास आहे आणि त्यात पुदिना व चंदनाची छटाही आहे. ३ नवीन श्रेणींमध्ये, हॅण्ड बाम्स, शॉवर जेल्स, बॉडी बटर, बॉडी योगर्ट, बॉडी स्क्रब आणि बॉडी लोशन-टू-ऑइल्स अशा अनेकविध उत्पादनांचा समावेश आहे.

लिमिटेड-एडिशन उत्पादनांशिवाय, बॉडी शॉपच्या ख्रिसमस कलेक्शनमध्ये अॅव्हाकॅडो, शीया आणि एडलवाइज श्रेणींचाही समावेश आहे. ही सर्व उत्पादने ग्राहकांना स्वत:ची काळजी घेण्याचा सर्वोत्तम अनुभव देण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आली आहेत. प्रत्येक श्रेणीमध्ये कॉम्बोज आणि गिफ्ट सेट्स आहेत. तुमच्या कुटुंबियांमध्ये व मित्रमंडळींमध्ये ख्रिसमसचा उत्साह पसरवण्यासाठी ही उत्पादने उत्तम आहेत.

वाइल्ड पाइन लिमिटेड एडिशन: बॉडी शॉपची वाइल्ड पाइन श्रेणी हे अप्रतिम वेगन ख्रिसमस गिफ्ट आहे. या उत्साहवर्धक सुवासाच्या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेलाही ताजेतवाने वाटेल. या उत्पादनश्रेणीत शॉवर जेल, हॅण्ड बाम, बॉडी लोशन-टू-ऑइल, बॉडी बटर आणि यू डी टॉयलेट यांचा समावेश आहे. या श्रेणीमध्ये पाइन अँड डिव्हाइन इसेन्शिअल्स भेटवस्तूही आहेत. त्यामध्ये हॅम्ड बाम, शॉवर जेल आणि बॉडी लोशन-टू-ऑइलचा समावेश आहे. तसेच पाइन अँड डिव्हाइन मिनी गिफ्ट संचात शॉवर जेल व बॉडी बटरचा समावेश आहे.

स्पाइस्ड ऑरेंज लिमिटेड एडिशन: रसदार संत्र्याचा, उबदार व्हॅनिलाचा आणि टणक दालचिनीचा दिलासा देणारा सुवास यांनी युक्त असलेली या श्रेणीतील उत्पादने ९७ टक्के नैसर्गिक घटकांसह तयार करण्यात आली आहे. या श्रेणीतील बहुतेक उत्पादने वेगन आहेत, त्यांचे पॅकेजिंग १०० टक्के रिसायकल करण्याजोगे आहे.

या विशेष एडिशनमध्ये शॉवर जेल, हॅण्ड बाम, बॉडी बटर, बॉडी स्क्रब आणि बॉडी योगर्टचा समावेश आहे. त्यात २ गिफ्ट सेट्सही आहेत- ऑरेंज अँड स्टॉकिंग्ज स्पाइस्ड ऑरेंज मिनी गिफ्ट, यामध्ये शॉवर जेल व बॉडी बटर आहे आणि ऑरेंजेस अँड स्टॉकिंग्ज स्पाइस्ड ऑरेंज इसेन्शिअल्स, यामध्ये शॉवर जेल, हॅण्ड बाम व बॉडी योगर्ट आहे.

पॅशनफ्रुट: आश्चर्यकारक तीक्ष्णपणा आणि शांत उबदारपणा असलेला फळाचा सुवास यांमुळे बॉडी शॉपची स्पेशल एडिशन पॅशनफ्रुट श्रेणी घ्राणेंद्रियाला अविश्वसनीय  समाधान देते. या श्रेणीतील प्रत्येक उत्पादन रसाळ व मधुर आहे आणि हे घटक उन्हाळ्यासाठी उत्तम वाटत असले, तरी प्रत्यक्षात त्वचेचे उत्तम पोषण करतात आणि तिला मुलायम-गुळगुळीत राखतात. या श्रेणीमध्ये बॉडी मिस्ट, बॉडी बटर, बॉडी योगर्ट, बॉडी स्क्रब आणि शॉवर जेलचा समावेश आहे. ही सगळे उत्पादने तुमच्या संवेदना सुखावणारी आणि तुमच्या त्वचेचा तकाकी देणारी आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: