अकोला जिल्हा बाळापुर तालुक्यातील अंत्री येथील सुरज दिलीप शेगोकार अंदाजे वय (33) वर्ष 23 जुलै रोजी सायंकाळी 6;00 वाजताच्या सुमारास गावा शेजारील धरणात बुडाल्यी माहीती बाळापुर तहसीलदार वैभव फरतारे सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना 24 जुलै रोजी देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले होते.
काल दीवस भर धरणात सर्च ऑपरेशन राबविले असता उशिरापर्यंत शोध घेतला परंतु काहीच मिळुन आले नाही आज पुन्हा सकाळपासूनच सर्च ऑपरेशन चालु केले असता दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आज दुपारी मृतदेह शोधून बाहेर काढला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांचे नेतृत्वात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे, यांचे सहकारी सळेदार,अंकुश सदाफळे, विष्णु केवट,शेखर केवट, ऋषिकेश राखोंडे,अमर ठाकूर,विकी गाडगे,मनोज कासोद,यांनी ऑपरेशन राबविले.
सोबतच अजिंक्य साहसी संघाचे तलाठी प्रशांत बुले साहेब,अश्विन दाते,श्रीकांत गावंडे,शिवराज बुले यांनीही सहकार्य केले. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे सर, उरळ पोलीस ठाण्याचे पो.नि.गोपाल ढोले सर तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.