अकोला – ०५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्य़ातील बाळापुर येथील भिकुंडनदी पात्रात बापाने आपल्या ७ आणी ५ वर्षांच्या दोन मुलींना चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी जिवंत फेकुन दील्याची माहीती वरुन काल पासुन स्थानिकांकडून शोध मोहीम चालु होती परंतु काहीच मिळुन आले नाही बुलढाणा जिल्हाधीकारी कीरण पाटील सर आणी बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अनिल जुंमळे सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करत लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, शेखर केवट,मयुर कळसकार,विष्णु केवट, शिवम वानखडे,अश्विन केवट,विकी गाडगे,
गौरव गाडगे,प्रतिक बोरसे यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहचले लगेच आत जाऊन सिन ट्रेस केला असता जागेवर नदीत पात्रात खोल पाणी आणी सेंटर ला तळात गणपती मूर्तीचे ढाचे,व दगड लोंखंडी राॅड असल्याचे ट्रेस झाले एक्सपर्ट स्विमर टीमने साखळी पद्धतीने अंडर वाॅटर सर्चिँग चालु केले तरी काहीच मिळुन न आले नाही शेवटी रात्री बारा वाजता दोन्ही मृतदेह रेस्क्युबोटीने सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून एक.मी.अंतरावर एक आणी तेथुन पुढे १०० मीटर अंतरावर दोन्ही बहीणींचे मृतदेह शोधण्यात आम्हांला यश आले,
घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे सर, डिवायएसपी ठाकरे साहेब खामगाव,डिवायएसपी बाळापुर गजानन पडघन, पो.नि.अणील जुमळे साहेब,पो.नि.ग्रामीण खामगाव व्यंकटेश आलेवार साहेब,एपिआय रवी मुंडे साहेब,
पिएसआय पुसाम मॅडम,पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण,बाळकृष्ण फुंडकर,संजय काकडे, नितेश राठोड,मुकेश इंगळे, स्थानिक गुन्हेशाखेचे पो.नि.लांडे सर.एपिआय चेचेरे साहेब,आणी पो.काॅ.हजर होते. नातेवाईक हे हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.