नरखेड – जीवन विकास विद्यालय, देवग्राम येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती च्या निमित्ताने 19 फेब्रुवारी 2023 ला ,शिवजयंतीपासून महाराष्ट्र गीत हे राज्य गीत म्हणून शासनाच्या परिपत्रकानुसार सुरुवात झालेली आहे. शिवजयंती ला महाराष्ट्र गीत राज्य गीत म्हणून गायन करण्यात आले. संगीत शिक्षक श्री प्रमोद बैस ,आणि त्यांची चमू आणि सर्वच विध्यार्थी आणि शिक्षक वृंद या सर्वांनी गीतगायन केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने विधार्थांची भाषणे झाली तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री मदन ढोले यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे होते ,त्यांनी सुद्धा शिवाजी महाराज बद्दल मोलाची माहिती दिली.
कार्यक्रमाला उपस्थित म्हणून शिक्षक गण श्री मंगेश निंबुरकर,श्रीमती सुषमा बढिये, श्री मनोहर कामडे, श्री प्रमोद बैस, श्री संदीप फुके, श्री श्रीधर मानकर, श्री प्रमोद पांगुळ यांनी कार्यक्रमासाठी फार मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 8 च्या विधार्थीनी कु. रेणुका वासाडे आणि कु वेदिक ठोंबरे या दोघींनी मिळून केले. आभार प्रदर्शन कु. वेदिका ठोंबरे नि केले , अशाप्रकारे वंदेमातरम गीत म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.