अकोला – अमोल साबाळे
ज्याप्रमाणे त्रिवेणी संगमाचे महत्त्व आहे तसेच महत्त्व म्हणजे 14 नोव्हेंबर हा आजचा दिवस. कार्यक्रमाची सुरुवात या तिन्ही समाजसेवकांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगळे सर यांनी केले. कार्यक्रमास अध्यक्षाचे स्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री भगत सर यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.खिरोळकार सर,श्री.चितोडे सर,श्री.घुगरे सर,श्री.चव्हाण सर,श्री.बाठे सर, कु.कुचके मॅडम,कु.पाटकर मॅडम व सौ.जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषण कविता व गायन इत्यादी मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.भगत सर यांनी या थोर पुरुषांच्या कार्याची माहिती सांगितली.
उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच बालक दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषण,कविता व गायन यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता सौ जाधव मॅडम यांनी आभार प्रदर्शन करीत केली.