Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीकेरळ मालिका स्फोटातील आरोपीचा मोठा खुलासा...

केरळ मालिका स्फोटातील आरोपीचा मोठा खुलासा…

न्युज डेस्क – केरळमधील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला. जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी तेथे प्रार्थना सभा सुरू होती. 48 वर्षीय डॉमिनिक मार्टिनने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारून आत्मसमर्पण केले. आता त्याने इंटरनेटवरून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा केला आहे. डॉमिनिक मार्टिन यांनी सांगितले की, हा बॉम्ब बनवण्यासाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च झाले आहेत. मार्टिनने आखाती देशात फोरमॅन म्हणून अनेक वर्षे काम केले आहे, इथेच तो इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकत्र करून शिकला.

केरळ बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या डॉमिनिक मार्टिनचे कुटुंब पाच वर्षांहून अधिक काळ कोचीजवळ भाड्याच्या घरात राहत असून, ते स्वत: आखाती देशात काम करत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट मालिका करण्यासाठी तो आखाती देशातून केरळमध्ये परतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटासाठी वापरण्यात आलेले आयईडी हे कमी दर्जाच्या स्फोटकांपासून बनलेले होते, ज्याचा वापर फटाक्यांमध्ये केला जातो, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मार्टिनने आपल्या घरी आयईडी एकत्र केली आणि ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या’ प्रार्थनासाठी उपस्थित असलेल्या लोकांची हत्या करण्याच्या उद्देशाने स्फोटकं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोटके ठेवले होते . आत्मसमर्पण करण्यापूर्वी मार्टिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेशही पोस्ट केला होता.

व्हिडीओमध्ये त्यांनी दावा केला आहे की, बॉम्बस्फोट घडवण्याचा निर्णय समाजाचे शिक्षण ‘देशविरोधी’ असल्याने त्याने घेतला. समाज मोठ्यांना तसेच लहान मुलांना चुकीचे संस्कार शिकवत आहे. ते थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले होते मात्र त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

ही शिकवण देश आणि समाजासाठी चुकीची असल्याचे लक्षात येताच त्यांनी मालिका बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा निर्णय घेतला, असा दावा मार्टिनने केला. रविवारी कोचीजवळील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन महिला आणि 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता, तर 50 जण जखमी झाले होते.

‘यहोवाच्या साक्षीदारांच्या’ अधिवेशनाला सुमारे 2,000 लोक उपस्थित होते. प्रार्थना सभा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच एकामागून एक तीन स्फोट झाले. प्रार्थनेदरम्यान पहिला स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट होताच सर्वत्र धुराचे लोट पसरले आणि तेथे चेंगराचेंगरी झाली. आता या स्फोटांची चौकशी एनआयए करणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: