मुंबई – गणेश तळेकर
‘राकेश राऊत प्रॉडक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे एक छानसे गीत. ज्याचे बोल आहेत ‘झुरत्या मनाला ‘ अभिनेता निखिल चव्हाण आणि इन्स्टा-रील फेम आकाश जाधव आणि श्रुष्टि मालवंदे यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
याचे गायक आहेत मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) विनोद तावडे आणि सातारा-कराड येथील एका ट्रक ड्राईव्हरची मुलगी समीना शेख. संगीतकार आहेत विनीत देशपांडे- अनिरुद्ध जाधव आणि गीतकार आहे ऋतुजा नारायण. या गाण्याचे निर्माते राकेश नारायण राऊत आहेत व सहनिर्माते आहेत अंकुश जाधव तर दिग्दर्शन स्वप्नील पाटील यांनी केले आहे.
रोहित जाधव हे प्रोजेक्ट हेड आहेत तर छायाचित्रण (DOP) केले आहे मयूर पारणकर यांनी. ‘सुरेल म्युझिक’ या यूट्यूब चॅनेल वर हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर आवर्जून पहा, ‘ ‘सुरेल म्युझिक’ या यूट्यूब चॅनेलवर झुरत्या मनाला….!’ आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.