Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingऑटो रिक्षाचालकाने चक्क रेल्वे फूटओव्हर ब्रिजवर चालविला ऑटो...व्हिडीओ व्हायरल...

ऑटो रिक्षाचालकाने चक्क रेल्वे फूटओव्हर ब्रिजवर चालविला ऑटो…व्हिडीओ व्हायरल…

न्युज डेस्क – नवी दिल्लीतील ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी दिल्लीतील एक ऑटो चालकाने गर्दीच्या फूट ओव्हर ब्रिजवर आपला ऑटो चालवताना दिसत आहे. ही घटना हमदर्द नगर रेड लाईट संगम विहार ट्रॅफिक सर्कल येथे घडली. विशेष म्हणजे फूटओव्हर ब्रिजखालील रस्त्यावर ऑटोरिक्षा चालक वाहतुकीत अडकला होता. ट्रॅफिक टाळण्याच्या प्रयत्नात त्याने ऑटो फूटपाथवर नेला आणि नंतर फूट ओव्हर ब्रिजच्या पायऱ्यांवर वळवला. 25 वर्षीय मुन्ना असे चालकाचे नाव आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ड्रायव्हरने ऑटो पुलावर आणला तेव्हा ऑटोरिक्षा रिकामी होती. मात्र, ड्रायव्हरला पायऱ्या चढण्यास मदत केल्यानंतर आणखी एक व्यक्ती ऑटोमध्ये बसताना दिसली.

दरम्यान, पुलावरून चालणाऱ्या लोकांना या कारवाईचा धक्का बसला आणि त्यांनी पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ऑटो जप्त केला आणि संगम विहार येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय ड्रायव्हरला अटक केली. त्याला मदत करून ऑटोच्या आत उडी मारणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. अमित असे त्याचे नाव असून तो संगम विहार येथील रहिवासी आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: