अमरावती – सुनील भोळे
दिनांक 26/7/2024 रोजी महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेमध्ये जनावरे पाळणे संबंधी नियमन तसेच सर्व उत्पत्ती नियंत्रण उपक्रम याबाबत बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये महानगरपालिकेमार्फत उपद्रवी व मोकाट स्वरूपात असलेले जनावरे बंदिस्त करताना येणाऱ्या अडचणी व कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यात आली त्यानुसार यापुढे जनावरे सोडत असताना वाहतूक पोलीस तथा संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगी घ्यावी लागणार, जनावरे पाळणे संबंधी जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी परवाने देताना महानगरपालिकेची ना हरकत घ्यावी लागेल, जनावरे पाळणे संबंधी परवाने काढलेले नसल्यास जनावरे मोकाट स्वरूपात समजून महानगरपालिकेच्या पथकाद्वारे जप्त करण्यात येतील,
तसेच यापुढे पकडण्यात आलेली जनावरे व जनावर मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच कोर्टासमोर जाऊन दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरे सोडण्यात येतील, सण उत्पत्ती नियंत्रण संबंधी मोकाट कुत्र्यांसंबंधी, माननीय सर्वोच्च न्यायालय पशुसंवर्धन विभाग आयुक्त कार्यालय, तसेच ॲनिमल बर्थ कंट्रोल समिती, श्वान उत्पत्ती नियंत्रण समिती,(Abc rule 2001 ) मार्गदर्शनामध्ये तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे दिशा निर्देशानुसार भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ यांचे दिशानिर्देशास अनुसरून मोकाट कुत्र्यांसंदर्भामध्ये कार्यवाही करण्यात येईल, सदर बैठकीमध्ये श्वान यांचे तक्रारी संबंधांमध्ये हेल्पलाइन श्री पंकज कल्याणकर मो.नं.९८२३३५६९१२,
श्री सागर मैदानकर मो.नं.७०६६४४८८६६, श्री निलेश सोळंके मो.नं.९८६०४३०००० हे नंबर प्रसिद्ध करण्यात येत असून, जनावरासंबंधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 89 कलम 90 कलम 91 कलम 92 कलम 100 कलम 106 कलम या कलमान्वये अनधिकृत पोलीस विभागामार्फत पशुपालनासंभदी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, सदर बैठकीस पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक श्री व्हीएस आलेवार,
श्री समाधान वाटोळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगे नगर, वाहतूक पोलीस पोलीस निरीक्षक श्रीमती उईके, अधिकारी हजर होते. जनावरे पाळणे संबंधी नियम पाळूनच जनावरे यांचे पालन करावे जेणेकरून उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक लहान मुले यांचे जीवित हानी व अपघात होणार नाही, या सर्व बाबीवर उपयोजना करण्यासंबंधी विविध विभागास माननीय आयुक्त यांनी निर्देशित केले.