Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | घरफोडी करणारा अटटल गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक...

अमरावती | घरफोडी करणारा अटटल गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक…

पोस्टे वरूड येथे फिर्यादी नामे संजय भिमरावजी निमजे, वय ५१ वर्ष रा देशमुख वाडी, वरूड ता. वरूड जि. अमरावती. यांनी पोलीस स्टेशन वरूड येथे दिनांक ०६/१२/२०२२ रोजी रिपोर्ट दिला की कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे दरवाज्याचे कुलुप कोन्डा तोडुन घरात प्रवेश करून घरातील आलमारीतुन ०६ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम ६००० रू. असा एकूण ३६,०००/- रू. चा मुद्देमाल चोरी केला वरून पोलीस स्टेशन वरूड गुन्हा रजि. क्रमांक ८७१ / २०२२ कलम ४५४, ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा पोलीस स्टेशन अभिलेखावर तपासावर असूण वरीष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना मिळालेल्या गोपनिय बातमीदारांच्या मदतीने खात्रीशीर माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा पारडी बोरांग ता. वरुड येथील धिरज सुनील शिरभाते याने केली असूण तो चोरी केल्या पासूण मोहगाव / झिल्पी ता. हिंगणा जि. नागपूर येथे राहत आहे.

अशा मिळालेल्या माहीतीवरूण त्यास ताब्यात घेवुन गुन्हया बाबत सखोल विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्यावरून त्याचे ताब्यातुन चोरी केलेला मुददेमाल ६.३४० ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत ३४,८७० रू. ची आणि रोख रक्कम ६,००० रू. असा एकूण ४०,८७० रू. चा जप्त करून पोलीस स्टेशन वरूड यांचे ताब्यात दिले असुन पोलीस स्टेशन वरूड पुढील तपास करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. शशीकांत सातव, मा. पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सफौ संतोश मुंदाने, पोहवा रविंद्र बावने, बळवंत दाभने, पोकॉ पंकज फाटे, पोकॉ दिनेश कनोजिया, तसेच पोलीस स्टेशन वरूड येथील सफौ. राजु मडावी, पोका सचिन भगत, विनोद पवार चालक कमलेश पाचपोर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: