खामगाव – भाजप जिल्हाध्यक्ष आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत शिबिरात आज 5 फेब्रुवारी रोजी 228 जणांनी रक्तदान केले. खामगाव मतदार संघ भाजयुमो व विद्यार्थी आघाडीच्या वतीने हे भव्य रक्तदान शिबिर आ अँड आकाशदादा फुंडकर यांच्या माधव नगर स्थित “वसुंधरा” निवासस्थासमोर आयोजित करण्यात आले. भाजपचे जेष्ठ नेते साहित्यिक रामदादा मोहिते यांचे शुभहस्ते व भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उदघाटन लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात झाले.
या शिबिरात खामगाव मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी केली. 228 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. आ अँड फुंडकरांच्या वाढदिवस दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर घेऊन साजरा केले जातो. यंदाही रक्तदान करण्यासाठी हा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते शत्रुघ्न पाटील, ओंकारआप्पा तोडकर, दर्शनसिंह ठाकूर, प्रमोदसेठ अग्रवाल, डॉ एकनाथ पाटील,
भाजप जिल्हासचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख,संतोषसेठ डीडवानी , चंदुसेठ मोहता,महेंद्र रोहनकार, माजी नगराध्यक्ष सौ अनिता डवरे , महिला आघाडी प्रदेश सदस्य सौ अनिता देशपांडे, माजी प स सभापती सौ रेखा मोरे, महिला आघाडी शहाराध्यक्षा सौ रेखा जाधव, राजेंद्र धानोकार, सतीशअप्पा दुडे, अमोल अंधारे, विजय महाले, राकेश राणा, विनोद टिकर, शोहरत खान, तुषार गावंडे, राजेश तेलंग,
आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सकाळपासूनच आ अँड आकाशदादा फुंडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, अधिकारी वर्ग, विविध शैक्षणिक , सामाजिक संघटनेचे पदाधिकारी , सर्व स्तरातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. विशेष म्हणजे प पु स्वामी गुरुवर्य श्री रामभारती महाराजांनी स्वतः येऊन आ अँड आकाशदादा फुंडकर यांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. रक्तदान केलेल्या सर्वाना भाजयुमो व विद्यार्थी आघाडी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या भव्य शिबिरासाठी खामगाव मतदारसंघ भाजयुमो व विद्यार्थी आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले अन..दोन्ही रक्तपेढी झाली फुल्ल यंदाही आ अँड आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवशी रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सामान्य रुग्णालय खामगाव व सोनी ब्लड बँक खामगाव या शहरातील दोन्ही रक्तपेढ्यांची चमू शिबिरासाठी हजर होती. 228 जणांनी रक्तदान केले.
अनेक जण वेटिंगवर होते, परंतु जेवढी रक्त संकलन क्षमता या दोन्ही रक्तपिढीची होती ती संपल्याने शहरातील या दोन्ही रक्तपेढी फुल्ल झाल्या. त्यामुळे सुमारे रक्तदान करण्यासाठी आलेले 100 कार्यकर्ते रक्तदान करण्यापासून वंचित राहिले. या राहिलेल्या कार्यकर्त्यांची नोंद घेतली असून अत्यावश्यक काळात गरजू रुग्णासाठी ते रक्तदान करण्यासाठी तातडीने हजर राहतील अशी ग्वाही यावेळी भाजयुमो व विद्यार्थी आघाडीच्या वतीने देण्यात आली.