वाशिम (मालेगाव) – चंद्रकांत गायकवाड
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरारबंदी आरोपीला मालेगाव पोलीसाची मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे.मालेगाव पोलीसाच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सन 1987 पासून फरार असलेले कैदी क्र.C/2032 नामे गजानन पाचुराम ओझा वय 62 वर्षे रा. मालेगाव ह.मू. शिव सेना वसाहत,अकोला याचे विरुद्ध पोलीस स्टेशन मालेगाव येथे अप क्र 3059/2013 कलम 224 भादवी नुसार गुन्ह्याची नोंद होती.
या गुह्यतिल फरारबन्दी यास 36 वर्षा नंतर मालेगांव येथील तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि सैबेवार, पो.हवालदार कैलास कोकाटे, पो.हवालदार . सुनिल पवार, पो का. अमोल पवार यांनी ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ता.02 फेब्रुवारी रोजी अकोला येथुन ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मालेगाव पोलीस स्टेशनला नव्याने बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांनी आतापर्यंत अशा अनेक क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे.या अगोदर एक चोरीचा ट्रॅक्टर कर्नाटक येथे जाऊन ट्रक जप्त करून आणला होता.तर, मागच्या महिन्यात डोणगाव येथील एक व्यक्ती चोरीचा बनाव करीत असल्याचे उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई केली आहे.