पातुर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पातुर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…
पातुर – निशांत गवई
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भर रस्त्यावर अडवून त्यांना अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा निषेध करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पातुर तालुक्याच्या वतीने आज रोजी 22 ऑगस्ट 2023 रोजी पातुर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देऊन यातील हल्ल्यातील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे.
पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार विजय खेडकर यांनी हे निवेदन स्वीकारले असून
यावेळी निवेदन देणाऱ्यांमध्ये देवानंद गहिले पातुर तालुका अध्यक्ष,श्रीधर लाड उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघटना, पातुर, गणेश सुरजूसे जिल्हाध्यक्ष अकोला, संजय गोतरकर कार्याध्यक्ष मराठी पत्रकार संघ पातुर, राजाराम देवकर सहसचिव पत्रकार संघ पातुर,
ॲड. सौ. सुरेखा हिरळकर, नय्यरखान उर्फ गुड्डू भाऊ, शैलेश जगदाळे, दिलीप गिऱ्हे, सय्यद हसन बाबू, प्रेमचंद शर्मा, अजय घुले, डॉ. सुभाष हिरळकर, सचिन शेळके, शेख वसीम, छगन कराळे, रमेश नीलखन, मनोहर सोनोणे, आदी सह इतर पदाधिकारी पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा यावेळी समावेश होता
पत्रकारावरील हल्ले खपवून घेतल्या जाणार नाहीत – देवानंद गहिले
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भर रस्त्यावर अडवून त्यांना अमानुषपणे मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु संदीप महाजन हे त्या हल्ल्यातून कसेबसे बचावले परंतु त्यांना झालेली गंभीर मारहाण पाहता त्यांना जिवे मारण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता हे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहे.
दिवसेंदिवस राज्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची दखल घेतल्या जात नाही परंतु लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर जर हल्ले होत असतील तर हा प्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अजिबात खपवून घेणार नाही या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो.
या प्रकरणातील हल्लेखोर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात असे गुन्हे घडू नये याकरता किंवा घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर दंडाची शिक्षा व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले यांनी यावेळी दिला आहे.