पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस ठाण्यात एका संवेदनशील प्रकरणात आरोपी व पीडित दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. दुपारी २ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोघेही ठाण्यात होते, मात्र या कालावधीत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीसह पीडीता फरार झाल्याने आता पोलिसांची चांगली तारांबळ उडाली आहे. चान्नी पोलिसांच्या निष्काळशीपणाबाबत आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोघांचेही मुलीचे आणि मुलाचे आई-वडील यांना देखील ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांच्यासमोर घटनेचे कोणतेही निराकरण न होण्याची स्थिती राहिली. पोलीस अधिकारी आरोपीच्या पालकांना सोबत घेऊन नातेवाईकांकडे विचारपूस करत असल्याची माहिती आहे. एकूणच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे आता या प्रकरणात कुठली कारवाई पोलीस करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
पोलिसांकडून पुढील तपासाची माहिती अस्पष्ट…
प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना तासन्तास ठाण्यात थांबवूनही अधिकृत चौकशी किंवा कारवाई झाली नाही. परिस्थितीमुळे संबंधित कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन काही नातेवाईकांकडे विचारपूस केल्याची माहिती असून, पुढील कारवाईसाठी अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. यासंदर्भात पोलीस दप्तरी कुठलीही नोंद न करण्यात आल्याने आता पोलीस चांगलेच येतात सापडले आहेत पोलिसांनी केलेली दिरंगाई ही कुणाच्या बाजूला आहे याबाबत सखेत आश्चर्य वाटतं केले जात आहे.
संबंधित घटनेवर स्थानिकांचा संताप…
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठाण्यात कारवाईला विलंब का होत आहे याबद्दल नागरिक प्रश्न विचारत आहेत.पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.