मुंबई – गणेश तळेकर
दादर वेस्ट मधल्या शारदाश्रम शाळेचा अमृत महोत्सवी वर्ष या निमित्याने षण्मुखानंद मध्ये आनंद सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमात आपले राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन प्रमुख अतिथी होते.
श्री गजेंद्र शेट्टी सर यांनी ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते.या मध्ये 130 विद्यार्थी 50 शिक्षक व शिक्षिका यांना घेवून महाराष्ट्रीयन सांस्कृतिक सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे अंधेरी येथील हिंदोळा ग्रुप नी पण छान सादरीकरण केले. हा सोहळा पाहण्यासाठी बरेच ( उच्चस्तरीय)आजी माझी विद्यार्थी यांनी आनंद घेतला.
हा सांस्कृतिक सोहळा सौ स्नेहा शिराळकर दादर यांनी ऑर्गनाईज केला होता. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सौ शोभाताई नाखरे यांनी उत्तमरीत्या पार पाडलं. आणि कोरोग्राफीची जबाबदारी मृण्मयी आणि मैत्रेयी यांनी घेतली.