अमरावती – मराराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२ फेब्रुवारीला अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क येथे आयोजित केले असून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सुत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी उपस्थित रहाणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापारेषणचे संचालक (मासं) श्री सुगत गमरे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यकारी संचालक,महावितरण श्री अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक,प्रादेशिक संचालक,नागपूर श्री सुहास रंगारी,मुख्य अभियंता महावितरण अमरावती परिमंडळ श्री ज्ञानेश कुलकर्णी राहणार आहे.
महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटना ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यातील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, दक्षता व सुरक्षा, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिका-यांची बलाढ्य संघटना आहे.संघटनेच्या वार्षीक आणि ४५ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खाजगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण यावर मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या तिनही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण बागूल, सरचिटणीस श्री संजय खाडे, संघटन सचिव श्री प्रवीण काटोले आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या अमरावती कार्यकारिणीचे अध्यक्ष नितीन नांदुरकर, सचीव फुलसिंग राठोड अकोला कार्यकारिणी अध्यक्ष अनंत साबळे, सचिव अमोल बाहेकर,प्रशांत लहाने,यज्ञेश क्षीरसागर,प्रमोद कांबळे आणि सर्व सदस्य झटत आहे.