सांगली – ज्योती मोरे.
सालाबादप्रमाणे जयंतीत्सोवानिमित्त स्मारक समिती तर्फे शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिरे व मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते. सोमवार (ता.29) ते बुधवार (ता.31) तीन दिवसीय साजऱ्या झालेल्या जयंतीत्सोवामध्ये पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धां आयोजित केल्या होत्या.
त्यानंतर होळकर शाहीवरील धनगरी ओवींचा कार्यक्रमही पार पडला शाहीर आनंदा हक्के सांगली,शाहीर महादेव बुडके वासिम. दुसऱ्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौडी जि. अहमदनगर येथून आणलेल्या ‘प्रेरणा ज्योत’ मशालीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.धनगरी ढोलवादनाने स्वागत मिरवणूक पार पडली.
मुख्य तिसऱ्या दिवशी अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम झाला.रक्तदान, नेत्रदानासह आरोग्य तपासणी शिबिर, महाप्रसाद व महापुरुषांवर सादर लोकगीतांचे आयोजन स्मारकास्थळी करण्यात आले होते.
याप्रसंगी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम,भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेस नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, आयुक्त सुनील पवार,जयंतीत्सोव स्मारक समितीच्या अध्यक्षा नगरसेविका कल्पना कोळेकर, सहाय्यक आयुक्त खरात साहेब,
माजी महापौर नितीन सावगावे, नगरसेविका संगीता खोत, अप्सरा वायदंडे, सविता मदने व सोनाली सागरे,नगरसेवक मनोज सरगर,अभिजीत भोसले,मयूर पाटील,अमर निंबाळकर,अमित पारेकर,विनायक रुपणर,गजानन आलदर,तानाजी दुधाळ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंतीनिमित्त बुधवारी सकाळपासूनच स्मारकस्थळी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह नागरिकांची गर्दी होती. RK sports चे राहुल कांबळे सर यांचा सत्कार करण्यात आला, वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यादरम्यान घेण्यात आला.यामध्ये महाराष्ट्र केसरी पै.प्रतीक्षा बागडी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल सरगर दोघी महिला रणरागिणिचा विशेष सन्मान यावेळी झाला.
आयोजन समितीचे हनमंत खरात, दिगंबर यादव, उत्तम हराळे,बाळासाहेब खांडेकर,गणेश माने, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, मा.अमोल डफळे,नगरसेवक अभिजित भोसले,मनोज सरगर,राजेंद्र कुंभार, विजय घाडगे, काँग्रेसचे नेते रवींद्र खराडे, सागर माने, हणमंत खरात, उद्योजक पांडुरंग रूपनर, प्रा. निवांत कोळेकर, महेश सागरे, शहाजी कोकरे, राहुल कांबळे, डी.जी मुलाणी, सुरेश पांढरे, झेंगटे साहेब,अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ, बाळासाहेब माने,पडळकर सर,वाघमोडे सर,बिरू काळे,पल्लु पाटील,धोंडीराम आण्णा माने,मारुती बंडगर, आयुब बारगीर,यांच्यासह मान्यवर व उपस्थित होते. संयोजन नगरसेवक विष्णू माने यांनी केले.