रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी रविवार ला संत रोहिदास सभागृह, मंगळवारी वार्ड, रामटेक येथे महाराष्ट्र शाहीर परीषद व भारतीय कलाकार शाहिर मंडळ द्वारा आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंतीचा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी सामाजिक व देशहितासाठी लोककलेबद्दलचे योगदान इत्यादी विषयांचे सादरीकरण आपल्या कलेतून कलाकारांनी मांडणी केली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमादरम्यान अनेक कलाकारांना सन्मानित केले. यावेळी उपस्थितांमध्ये श्री ज्ञानेश्वरजी वांढरे (अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ कामठी), श्री भगवती सहारे, श्री रमेशजी कारामोरे (प्रहार जिल्हा प्रमुख), श्री राजेंद्र बावनकुळे (अध्यक्ष भारतीय कलाकार शाहिर मंडळ, जिल्हा अध्यक्ष म.शा.प.नागपूर)
तसेच शाहीर मंडळींमध्ये ब्रम्हाजी नवघरे, शिषुपालजी अतकरे (उपसरपंच, माजी सरपंच ग्रा. पं. काचुरवाही), भगवान लांजेवार (तालुका अध्यक्ष (म.शा.प. पारशिवनी), नरहरीजी वासनिक (कलावंत), अरुण मेश्राम, शा. युवराज अडकने, शा.भाऊराव मेंघरे, शा. शंकर वडांद्रे, शा.प्रदीप कडबे, श्री. सूरज नवघरे, वासुदेव आष्टनकर, लीलाधर आष्टनकर, वीरेंद्र सेंगर, रविंद्र मेश्राम, रामराव वडांद्रे, रमेश रामटेके, वासुदेव नेवारे, शंकर मौतकार, विष्णू मेंघर, हिरालाल बधन, दिलीप मेश्राम, विष्णू समरित, राजेंद्र बावणे, सुखदेव नेवारे, दर्शन मेश्राम, मधुकर भोयर, जयराम चौधरी, भास्कर उमाळे, पंचफुला मस्की, दुर्गाबाई वासनिक, अनिता बावणे, इंदुताई पडोळे इत्यादी कलाकारांसह श्री. मनोहर बावनकर, प्रशांत जांभुळकर, पुरुषोत्तम मानकर
व गावकरी मंडळी उपस्थित होते.