राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण मुंबईतील भाजप कार्यालयात जाऊन, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपचे सदस्यत्व घेतले. अशोक चव्हाण यांनी आज सकाळीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिला. तेव्हापासून चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यामुळेच राज्यात सोशल मिडिया जागृत होऊन अशोक चव्हाणांबद्दलचे जुने ट्वीट शोधू लागले. तर भाजपने चव्हाण यांच्या बद्दल सोशल मिडीयावर घोटाळ्याचे आरोप केले होते तर आता भाजपच्या प्रवेशाने सर्व आरोप भाजप स्वताच खोडून काढणार की काय?. याच बरोबर काँग्रेसचीही सोशल मिडीया अशोक चव्हाणाचा भरपूर समाचार घेत आहे. तर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्क्ष नाना यांनी भाजपचे ट्वीट पुन्हा शेयर करत भाजपला सुनावले…
भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे
किंवा ते जनतेला मुर्ख समजतात.
भाजपाचे आरोप – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत.
कृती – अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला
परिणाम- अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल
आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ?
निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते.
भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 13, 2024
किंवा ते जनतेला मुर्ख समजतात.
भाजपाचे आरोप – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत.
कृती – अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला
परिणाम- अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल
आता प्रश्न… pic.twitter.com/P1S04m3EVr