मुंबई – गणेश तळेकर
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहर्तावर स्वामी स्पर्श फिल्म्स निर्मित थर या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण जेष्ठ दिग्दर्शक अभिनेते विजयजी पाटकर यांच्या शुभ हस्ते अंधेरी येथे करण्यात आले.
तसेच Zee Music Co ने दहीहंडी वरील पहिले गाणे ही प्रदर्शित केले. पोस्टर अनावरणच्या वेळी राजा शिवछत्रपती मालिकेचे दिग्दर्शक विजयजी राणे, निर्माते विलास चव्हाण, कार्यकारी निर्माते अमित मोहिते, अभिनेता रंगराव घागरे, परेश मोरे, प्रशांत खांडगे पाटील, अभिनेत्री ललिता बरवे, सुनीता कांबळे आणि प्रतीक व दत्तात्रय करे उपस्थित होते.
बरेच वर्षांनी असा चित्रपट येत आहे. थर हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरुन थरावर थर रचेल असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी केले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे निर्माते विलास चव्हाण यांनी सांगितले.