Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीThane | जंगलात भयाण अंधारात सुरु होता तरुण-तरुणींचा नंगानाच...१०० तरुण-तरुणीला अटक...

Thane | जंगलात भयाण अंधारात सुरु होता तरुण-तरुणींचा नंगानाच…१०० तरुण-तरुणीला अटक…

Thane : 31 डिसेंबर निमित्याने आयोजित केलेल्या कासारवडवलीत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली असता या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या 100 हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्स, गांजा पोलीसांनी जप्त केल्या आहेत.

ठाण्यातील सेंडोबा मंदिराजवळील कासारवडवलीच्या खाडी लगतच्या जंगलात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. गणेश राऊत नावाच्या इसमाने या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत 100 हून अधिक तरुण-तरुणी सामील झाले होते. हे सर्वजण कार आणि बाईकने आले होते. या खाडीत अनधिकृतपणे भराव टाकून जागा तयार करून सोबतच जेवणाचे पदार्थ देण्यासाठी टेबल टाकण्यात आले होते. मटण, मच्छी, चिकनचीही व्यवस्था करण्यात आली होती. दारू, बियरचीही व्यवस्था होती. तसेच डीजेही लावण्यात आला होते. या खाडीच्या परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा पाच तास नंगानाच सुरू होता. टिप मिळताच पोलिसांनी प्लानिंग करून छापा टाकला आणि या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पार्टीत नशा करण्यासाठीच्या दारूच्या बॉटल्स, सिगारेटचे पॉकेट्स, बियरच्या बॉटल, ड्रग्स, एलएसडी, गांजा, चरस आदी अमलीपदार्थ ठेवण्यात आले होते, सोबत डीजेच्या तालावर नशेबाज तरुण-तरूणी थिरकत होते. रात्री 10 वाजता ही रेव्ह पार्टी सुरू झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या पार्टीची कुणकुण लागल्यानंतर ठाणे पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तात्काळ प्लानिंग तयार केले आणि कासारवडवलीच्या जंगलात धाड टाकली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: