राजु कापसे
रामटेक
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक द्वारा संचालित सेंटर फॉर आऊटरिच प्रोग्रॅम तर्फे “थांब रे मना” हितगुज कुमारवयीन विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमाचे आयोजन राणी दुर्गावती आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय टांगला येथे करण्यात आले. विश्वविद्यालया सन्माननीय कुलगुरु प्रो. मधुसूदन पेन्ना यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री सुनील ससनकर, समुपदेशिका म्हणून डॉ. अंशुजा किमतकर, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रो. ललिता चंद्रात्रे संचालक ,सेंटर फॉर आऊटरिच प्रोग्रॅम उपस्थित होत्या. किशोरवयीन व कुमारवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी याना लैंगिग शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच होणारे शारीरिक बदल व त्यामुळे असणारी अस्वस्थता याविषयी विद्यार्थ्यना समुपदेशन व्हावे, या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रा.ललिता चंद्रात्रे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितले.
डॉ. अंशुजा किमतकर यांनी शारीरिक स्वच्छता, मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी, कुटुंब व समाजासाठी असलेली जबाबदारी, या वयात मनाला आवर कसा घालावा, याविषयी अनेक उदाहरणांसह अतिशय समर्पक अशी माहिती देत “थांब रे मना” ही संकल्पना आपल्या संवादातून विद्यार्थिनींना स्पष्ट केली. यावेळी शिक्षक एम ए यावले, के के राठोड,एल एन कटरे, एस पी धोटे,एन व्ही वानखेडे, सी आर धानोरकर,पी एस उके, आर आर मडावी, आर यु जहागीरदार, आर पी महल्ले,के एम इटनकर, ए एस जीभकाटे, एस ए गजभिये,एस ए मरकाम, बी भोयर व अधीक्षक टी बी गायधने, एम एम मडावी आदी सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका चंदा धानोरकर यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयक योगिता गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका, श्री दीपक जोंधळे , मनीषा सहारे, आम्रपाली चौरे यांनी सहकार्य केले.