सांगली – ज्योती मोरे.
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारला जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर थाळीनाद आंदोलन केले. दरम्यान,कंत्राटी भरती सह सुशिक्षित बेरोजगारांना कर्मचारी,शिक्षक यांच्या विरोधात उभं करून शासनाला हा संप मोडीत काढायचाय असं मत समन्वय समितीचे पी.एन. काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी मध्यवर्ती संघटनेचे डी.जी.मुलाणी, कोषाध्यक्ष एस.एच.सूर्यवंशी, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संजय व्हनमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, पेन्शनर्स संघटनेचे सुरेंद्र पेंढुरकर, मिलिंद हारगे, राजेंद्र कांबळे, शरद पाटील, रवी अर्जुने, अमेय जंगम, शितल ढबू,संगीता मोरे, सुधाकर माने, राजेंद्र बेलवलकर, संतोष मदने तसेच इतर विभागातील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.