Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsThailand | थायलंडच्या चाइल्ड केअर सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार…मुलांसह किमान ३४ जणांचा मृत्यू…

Thailand | थायलंडच्या चाइल्ड केअर सेंटरमध्ये अंधाधुंद गोळीबार…मुलांसह किमान ३४ जणांचा मृत्यू…

Thailand : थायलंडच्या ईशान्य प्रांतात झालेल्या गोळीबारात 34 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वृत्संस्थांनी दिली आहे, पूर्ण तपशील अद्याप उपलब्ध नाही. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. वृत्तानुसार मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.

पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी होऊ शकते. घटनेची अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, ज्या व्यक्तीने गोळीबार केला तो माजी पोलिस आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.

लहान मुलांवरही चाकूने हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत. घटना घडवून हल्लेखोर तेथून पळून गेला. बँकॉक सारखाच नंबर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून तो पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की मृतांमध्ये 23 मुलांचा समावेश आहे. थायलंडमध्ये 2020 च्या सुरुवातीला एका सैनिकाने नाखोन रत्चासिमा सिटीमध्ये 21 लोकांना गोळ्यांनी लक्ष्य केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: