Sunday, December 29, 2024
Homeराज्यरामटेक तालुक्यातील मौजा नवरगाव येथील पाचशे वर्षापेक्षा अधिक वर्षापासून बैल पोळा गुडी...

रामटेक तालुक्यातील मौजा नवरगाव येथील पाचशे वर्षापेक्षा अधिक वर्षापासून बैल पोळा गुडी यजमानपद ठाकरे कुटुंब नवरगाव यांच्याकडे असते…

रामटेक – राजू कापसे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरगाव येथील नवीन पिढीतील बैलपोळा गुढीचे यजमान प्राध्यापक रत्नाकर श्रीपत ठाकरे यांना मिळाला आणि सदर बैलपोळा गुढी यात्रा वाजत गाजत बैलपोळा मैदानात निघाली मैदानाच्या ठिकाणी सर्वत्र गावकऱ्यांनी तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती व बळीराजाच्या मुख्य खांदा म्हणजे बैल त्याचा नवरदेव म्हणून या दिवशी पूजा केली जाते आणि वाजत गाजत गुढी यात्रेसोबत बैल सुद्धा पोळा मैदानात जातो आणि तिथे विविध श्लोकासहित व विविध धार्मिक नाऱ्यासहित पोळा उत्सवाची सांगता झाली याप्रसंगी नवरगाव निवासी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे दरवर्षीप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित होते,

तसेच सोबतच सरपंच कैलास ठाकरे सर्व ग्रामपंचायत सदस्य गावचे पोलीस पाटील चिंतामण येलेकर सहित ईश्वर मंदिर कर अभिमान सोनवणे शामसुंदर सोनवणे अनिल डबले हरिचंद चणेकार भीमराव शेळके प्रेमलाल हेलेकर सहित सर्व शेतकऱ्यांचे दुपट्टा नारळ देऊन डॉक्टर राजेश ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व उत्साहात बैल पोळा संपन्न झाला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: