Terrorist attack PAF : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील लष्कराच्या एअरबेसवर शनिवारी सकाळी हल्ला झाला. वृत्तानुसार, काही दहशतवादी पहाटे शिडी आणि तारा कापून एअरबेसच्या भिंतीवर चढले. या घटनेशी संबंधित जी छायाचित्रे समोर आली आहेत, त्यात एअरबेसमध्ये भीषण गोळीबार आणि बॉम्बस्फोटानंतर आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, या व्हिडिओंची अद्याप पुष्टी झालेली नाही.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एअरबेसवर सहा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यातील तिघांना पाकिस्तानी लष्कराने ठार केले. मात्र, अजूनही तीन दहशतवादी तळावर लपून बसले आहेत. या हल्ल्यात विमानाच्या इंधन टाक्या उद्ध्वस्त झाल्या.
या हल्ल्यात तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) संघटनेचे अनेक आत्मघाती हल्लेखोर सामील असल्याचे वृत्त आहे. या संघटनेचा प्रवक्ता मुल्ला मोहम्मद कासिम यांनीही हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.
२४ तासांत दुसरा मोठा हल्ला
पाकिस्तानातील मियांवली येथील हल्ला ही २४ तासांतील दुसरी मोठी घटना आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माइल खान भागातही बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. येथे पोलिसांना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्ल्यात जवळपास 5 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान अन्वारुल हक कांकेर यांनी या घटनेचा निषेध केला होता. दहशतवादाविरुद्धचे त्यांचे युद्ध सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Pakistan🚨 Six people were killed and 25 injured in a blast targeting a police van in Dera Ismail Khan. Gunshots were also heard after the blast. pic.twitter.com/HdF5RWzxkh
— OSINT Updates (@OsintUpdates) November 3, 2023