Thursday, December 5, 2024
Homeदेशझारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात...जामतारा येथे रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू...अनेक जण जखमी

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात…जामतारा येथे रेल्वेची धडक बसून दोघांचा मृत्यू…अनेक जण जखमी

न्युज डेस्क – झारखंडमधील जामतारा (Jamtara Train accident) रेल्वे अपघातात ट्रेनच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12254 आंग एक्स्प्रेस ही जासीडीहून आसनसोलला जात होती, कालझरिया स्टेशनजवळ अफवा पसरली की ट्रेनला आग लागली आहे. त्याचवेळी गोंधळ उडाला आणि प्रवासी ट्रेनमधून खाली उतरून इकडे-तिकडे धावू लागले. दरम्यान, अनेक प्रवाशांना पॅसेंजर ट्रेनची धडक बसली.

या घटनेबाबत जामतारा येथील काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “…मी घटनास्थळी रवाना होत आहे…मी यासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.” आम्ही हा मुद्दा विधानसभेतही मांडणार आहोत…”मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही…”

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: