सांगली – ज्योती मोरे.
सांगलीची सुकन्या कुमारी धैर्या प्रशांत भाटे मेकअप क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या cidesco परीक्षेत सांगलीचे नाव उज्वल केले आहे. नुकत्याच पुण्यामध्ये झालेल्या परीक्षेत तिने जगातील सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून बहुमान मिळवला आहे.
त्यामुळे सांगलीची अवघ्या दहा वर्षाची ध्येर्या जगातील सर्वात लहान वयाची पहिली मेकअप आर्टिस्ट बनली आहे.अशी माहिती धैर्या हिचे वडील प्रशांत भाटे आणि आई अस्मिता भाटे यांनी पत्रकार बैठकीत दिली. सांगलीतील मध्यम कुटुंबामध्ये राहणारी धैर्या प्रशांत भाटे हिने वयाच्या अडीच वर्षापासून स्वतःला मेकअप क्षेत्रामध्ये गुंतवून घेतले. पाच वर्षाच्या वयात ध्येर्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होत स्वतःचा मेकअप स्वतःच केला होता.
त्यानंतर आई अस्मिता भाटे यांच्या मदतीने मेकअप क्षेत्रातील सर्व धडे घेतले. सांगली फेस्टिवल सारख्या कार्यक्रमांमध्ये धैर्या हिनं सातव्या वर्षी 26 मिनिटांमध्ये ब्रॅडियल मेकअप करीत सर्वांना थक्क केलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून ध्येर्या हिने आपली चमकदार कामगिरी सर्वांना दाखवली.
मुंबई एक्सस्पो मध्ये दोन लाख लोकांसमोर तिने लाईव्ह मेकअप केला आणि सर्वांना चकित केले. त्यानंतर धेर्या हिने नुकतीच एक आंतरराष्ट्रीय परीक्षा दिली. यामध्ये ती उत्तीर्ण झाली. ही परीक्षा अत्यंत अवघड आणि तेरी बेस असल्याने तिला यामध्ये लवकर प्रवेश मिळत नव्हता मात्र आपलं टॅलेंट आणि जिद्दीच्या बळावर धैर्या भाटे हिने या परीक्षेत उतरत ती उत्तीर्ण करून दाखवली.
ही परीक्षा पास झाल्यानंतर सर्वात कमी वयाची मेकअप आर्टिस्ट म्हणून धेर्या भाटे तिची ओळख निर्माण झाली आहे. अवघ्या दहा वर्षाच्या धैर्या हिने आतापर्यंत 450 हून अधिक मेकअप केले आहेत तसेच तिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप परीक्षक बनायची जिद्द आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेकअप करण्याचा मनोदय सुद्धा तिने या निमित्ताने व्यक्त करून दाखवला. याचबरोबर ऑलिंपिकच्या माध्यमातून देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे.