किरण बाथम – नवी मुंबई
‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहोळा’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री – डॉ श्री तात्याराव लहाने, माजी डीन सर जे जे हॉस्पिटल, जिम्नास्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेकनिकल कमिटी चेयरमन पवन भोईर,, व निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. योगेश्वर दयाळ कौशिक यांच्या शुभ हस्ते पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या विजेंद्र जैन यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली.कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे ?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले,