सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
बारामती येथील शरद नगर येथे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधायुक्त ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलावाचे माननीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी स्पर्धेचे उद्घाटन झाले या जलतरण स्पर्धा महाराष्ट्र राज्य निमंत्रित होत्या.
यामध्ये 12 14 16 18 व 20 वर्षा वरील असे गट होते त्यामध्ये तेजस्विनी कुंभार इयत्ता 8 वी नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमची विद्यार्थी असून तिने 50 मीटर ब्रेस्ट्रोक मध्ये 44 सेकंदामध्ये स्पर्धा पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला तसेच तिला रोख रक्कम 11000 बक्षीस मिळाले तिला सौ संगीता पागनीस संचालिका, सुरज फाउंडेशन,प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल तसेच जलतरण प्रशिक्षक श्री नामदेव नलवडे सुशांत सूर्यवंशी व सुरज फाउंडेशन संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड व सचिव एन जी कामत तसेच स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी व श्री प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम तसेच तिचे पालक माणिकराव कुंभार यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले व तिचे सर्वत्र कौतुक होत आहे