Friday, November 1, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | महानगर तांड्यातील तीज महोत्सव उत्साहात साजरा…

अमरावती | महानगर तांड्यातील तीज महोत्सव उत्साहात साजरा…

अमरावती,दि.२५ऑगष्ट २०२२; बजांरा संस्कृतीचा महत्वाचा एक भाग आणि मांगल्याचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या तीज उत्सवाचे बंजारा समाजबांधवाच्या वतीने अमरावती महानगर तांड्यात आयोजित तीज उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. एकून दहा दिवस चालणारा तीज उत्सव हा विशेषता महिलांचा उत्सव असून लग्न असणाऱ्या मुलींसाठी या उत्सवात विशेष महत्व आहे.

यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उदयसिंग राठोड ,तर प्रा.अमरसिंग राठोड,चंदनसिंग राठोड ,राम पवार (नायक),प्रकाश चव्हाण(आसामी),हिरालाल जाधव (कारभारी),मनोहर चव्हाण(हसाबी),एड.राम आडे(नसाबी),आदींची प्रमुख उपस्थिती होती.तसेच दिनांक ११ ते २१ ऑगष्ट दरम्यान या उत्सवाचे अमरावती तांड्यात वेगवेगळ्या ठिकाणी विशेष आयोजन करण्यात आले होते.

पुर्वीच्या काळी दळण-वळणाचा अभाव असतांना शेकडो संस्थाने व राज्ये यांची जीवनावश्यक साहित्ये,जड-जवाहीरे,रत्ने आदी पुरविण्याचे काम बैल किंवा गाईचा पाठीवर लादून बंजारा समाजाकडून कण्यात येत असे याला लदेणी म्हटल्या जात असत. बंजारा समाजाच्या एका वस्तीला तांडा म्हटल्या जाते. ट्रॉंन्सपोर्टचा मुख्य व्यवसाय करणारा हा समाज त्याकाळात वातावरणातील बदलामुळे विशेषता पावसाळ्यात एका ठिकाणी दोन ते तीन महिने थांबत असत.या दरम्यान सोबतील काही दुसरे तांडेही त्यांना मिळायचे.त्यामुळे एक संस्कृती- एक बोली असणाऱ्या या तांड्यात मुली बघण्याचे आणि लग्नही लावल्या जात.त्यामुळे पुन्हा कधी भेटणार याची निश्चिती नसल्याने लग्न होणाऱ्या मुलींना आईवडीलांचा विसर पडावा यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येत असे.

परंतू आजही या समाजाकडून तीज उत्सवाची संस्कृती जतन करण्यात आली आहे. मुळात नायक हा तांड्याचा प्रमुख असल्याने या उत्सवाची सुरूवात तांड्याच्या नायकाच्या घरापासून होते.संगीतप्रेमी असलेल्या बंजारा भगीनी गाण्यात आणि डफड्याच्या तालात तल्लीन होऊन संपूर्ण उत्सवकाळात नाचतात. ईश्वराची आराधना,भेटीचा आनंद आणि विरहाचे दु:ख आदी भावभावना गाण्यातून व्यक्त केल्या जातात.

अमरावती महानगराचा विस्तार फार मोठा आहे . त्यामध्ये शंकरनगर , अर्जुननगर , रविनगर , मंगलधाम परिसर , विदर्भ महाविद्यालय परिसर इत्यादी भागात राहणारे बंजारा समाज बांधव आपापसात ठरवून कार्यक्रमाचे आयोजन करतात .या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन चव्हाण,डॉ.सुगत चव्हाण,विशाल जाधव, उमेश राठोड,बालकराम जाधव,शालिकराम राठोड ,राजकुमार जाधव,कैलास राठोड यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली.याशिवाय या कार्यक्रमात संपूर्ण तांड्यातील स्त्री – पुरुषांचा सहभाग असतो . संपूर्ण शहर या काळात गीत नृत्यांच्या तालासुराने गजबजून गेले होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: