अकोला : महावितरण कंपनी व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणामुळे तांत्रिक कामगारांचे होत असलेले शोषण या विरोधात तांत्रिक कामगार युनियन र.नं.5059 ने रणशिंग फुंकले असुन प्रकाशगड, बांद्रा मुंबई येथे दि. 05 एप्रील 2023 रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहीती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष गोपाल गाडगे व केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.
मुलुंड, ठाणे, पनवेल, खारघर, तळोजा, उरण, व जेएनपीटी, पुणे व इतर विभागातील वीज वितरणाचा परवाना अदाणी समुहाला तसेच इतर विभाग खाजगी कंपनीला देऊ नये, तांत्रिक कामगारांकरीता निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे, कंपनी अंतर्गत सुधारणाकरीता संघटनेसोबत चर्चा करण्यात यावी, सन 2018 ते 2023 ह्या पगार वाढ कराराप्रमाणे वर्ग 3 व 4 मधील तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता त्वरीत लागू करून महीणन्याला 20 लिटर प्रमाणे इंधन भत्ता देण्यात यावा. तसेच तांत्रिक कामगारांना फिल्डवर काम करण्यासाठी कंपनीच्या वतीने इलेक्ट्रीकल बाईक पुरविण्यात याव्या, स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी.
तांत्रिक कामगारांवर वसुली करीता होणारी दडपशाही व एकतर्फी कार्यवाही त्वरीत थांबवावी तसेच एल.टी.एच.टी लाईन व 33 के.व्ही उपेकदाची दुरूस्ती करण्यात यावी. राज्य शासनाच्या इतर आस्थापना प्रमाणे व महापारेषण व महानिर्मिती कंपनीप्रमाणे महावितरण कंपनीतील कामगारांच्या विनंती / वैद्यकीय / पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या बाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तांत्रिक कामगारांच्या संख्येनुसार आधुनिक टी. ॲण्ड पी. व सुरक्षा साधणे पुरविण्यात यावे. कंपनीमध्ये यंत्रचालकांची पदे सरळ सेवा भरती व्दारे न भरता 100 टक्के पदे वर्ग 4 मधील तांत्रिक कामगारांमधुन भरण्यात यावे. प्रलंबित असलेले अनुकंपा तत्वावरील प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावे. दि. 01/04/2019 नंतर कार्यान्वीत झालेले उपकेद्र खाजगी रित्या चालविल्या जात आहे. सदरहु उपकेंद्रामध्ये त्वरीत कंपनीचे यंत्रचालकांचे पदे मंजुर करण्यात यावे. प्रत्येक झोन मधील वितरण केंद्र (शाखा कार्यालय) व उपविभागीय कार्यालयाची वीज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यालय संख्येमध्ये वाढ करण्यात यावी, महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांनी पदोन्नती नाकारल्यास उच्च वेतनश्रेणीचे लाभ महानिर्मिती व महापारेषण कंपनीप्रमाणे संरक्षित करण्यात यावा.
महावितरण व महापारेषण मधील यंत्रचालकांच्या प्रोटेक्ट मध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण मधील यंत्रचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी महापारेषण प्रमाणे महावितरण मधील यंत्रचालकांचे पे प्रोटेक्ट करण्यात यावे. 33/11 के.व्ही उपकेद्राला सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावे, 33/11 के.व्ही. उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेले प्रधान यंत्रचालक व वरिष्ठ यंत्रचालकांचे कामाचे स्वरूप समान आहे. त्यामुळे प्रधान / वरिष्ठ यंत्रचालकांची (विनंती / प्रशासकीय / पदोन्नती) पदस्थापना करतांना कोणताही दुजाभाव न करता सर्व उपकेद्रामध्ये पदस्थापना देण्यात यावी, उच्च शिक्षित पदवी / पदविकाधारक तंत्रज्ञ / यंत्रचालका साठी Internal Notification पदे भरती प्रकीया राबविण्यात यावी. प्रत्येक झोन मधील वितरण केंद्र (शाखा कार्यालय) व उपविभागीय कार्यालयाची वीज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यालय संख्येमध्ये वाढ करण्यात यावी, बारामती परिमंडळातील सोलापुर / सातारा मंडळ कार्यालयांतर्गत सोलापुर शहर विभागातील 23 शाखा कार्यालये व सातारा विभागातील एमपीआर 89/2012 अन्वये पथदर्शी प्रकल्प अनुसार रदद झालेल्या शाखा कार्यालयातील 51 पदांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. दि. 101 जुलै 2022 ते दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंतची वाढीव महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्वरीत अदा करण्यात यावी. शासनाच्या नियमाप्रमाणे कंपनीतील अपंग कामगारांना सुविधा पुरविण्यात याव्या.
महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या तांत्रिक कामगारां करीता “कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना” राशीभुत विमा रक्कम 30 लाख करण्यात यावी, उपकेद्र सहायक भरती जाहीरात के 05 / 2019 नुसार प्रसारीत केलेली प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या 757 पात्र उमेदवारांची यादी कार्यान्वीत करण्यात यावी, संप स्थगिती नंतर हजर झालेल्या तांत्रिक कामगारांचे कपात करण्यात आलेले वेतन अदा करण्यात यावे, दिव्यांग तांत्रिक कामगारांना बदली किवा पदोन्नती पर पदस्थापना बाबत शासनाच्या निर्णया (शासन निर्णय अपंग/ 1004 / प्रक18/04/18-अ
दि.15/12/2004) प्रमाणे राहत्या ठिकाणापासुन जवळपास करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्यात यावी, निष्काशित केलेले वाशीम व ईतर विभागीय भरारी पथके पूर्ववत ठेवून वळविण्यात आलेले मंजुर पदे पुन्हा अबाधित ठेवण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावुन घ्यावे तसेच सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे आदी प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे व आंदोलन करून कळविण्यात आले आहे. तरी सुध्दा कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्याने तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण झाला असल्याने प्रकाशगड, बांद्रा मुंबई येथे दि. 05 एप्रील 2023 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याने या आंदोलनामागे राज्यातिल तांत्रिक कामगारांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष भी. आर. पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे. राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी पारेषण विक्रम चव्हाण, संजय पाडेकर, किरण कर्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर यांनी केले आहे.