Sunday, December 22, 2024
Homeराज्यजलसंपदा विभागातील अभियंत्यांचं तांत्रिक कौशल्य आणि गुणवत्तापूर्वक कामे जलसंपदेची खरी ओळख -...

जलसंपदा विभागातील अभियंत्यांचं तांत्रिक कौशल्य आणि गुणवत्तापूर्वक कामे जलसंपदेची खरी ओळख – डॉ. संजय बेलसरे…

नाशिक – प्रफुल्ल शेवाळे

दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नाशिक मेरी येथील अभियंता .पा.कृ.नगरकर सभागृहात सन्मा.डॉ.संजय बेलसरे ( सचिव, लाभवि. जलसंपदा विभाग, मंत्रालय महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते आणि सन्मा.लेखक अभियंता विलास शेळके, अभियंता शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मा.लेखक,अभियंता .लक्ष्मीकांत वाघवकर यांच्या… सहज आठवलं म्हणून…. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी नाशिक पंचक्रोशीतील तमाम सेवानिवृत्त अभियंतेही आवर्जून उपस्थित होते.भातसानगर, शहापूर, ठाणे, पुणे येथून ही वाघवकर यांच्यावर प्रेम करणारे आप्तस्वकीय उपस्थित होते…..

महाराष्ट्र शासनाच्या आतापर्यंत च्या इतिहासात जलसंपदा विभागात आजवर अनेक अनेक थोर ध्येयवादी अभियंता व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत.. या विभागात असताना आपलं तांत्रिक कौशल्य आणि बांधिलकी च्या भावनेने त्यांनी अनेक महत्वकांशी कामे पुर्णत्वस नेली आहेत…

त्यांनी केलेली गुणवत्ता पूर्वक कामे आज खऱ्या अर्थाने जलसंपदेची ओळख ठरली आहे.. असे वक्तव्य डॉ. संजय बेलसरे यांनी नाशिक येथील सेवानिवृत्त अभियंता लक्ष्मीकांत वाघवकर यांनी लिहलेल्या सहज सुचलं या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्या च्या निमित्ताने केलं आहे.

जलसंपदा विभागाचे पाटबंधारे प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंत्यासाठी आणि भविष्यात संबंधित काम करणाऱ्या अभियंत्यांसाठी सदर ग्रंथ एक दिशा दर्शक होऊ शकेल.. उत्कृष्ट अभियंता तोच असतो,

ज्याने अभियांत्रिकी तसेच अनुषंगिक कामांना आपली जिद्द, मेहनत, प्रामाणिक तेने आणि तांत्रिक कॊशल्याने, ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपलं सर्वोत्तम योगदान दिलेलं असतं..

मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण त्याच बरोबर गिरणा, पालखेड, संकल्पचित्र विभागात त्यांनी केलेल्या नोकरीं विभागाबरोबरच कनिष्ठ अभियंता संघटना, अभियंता पतसंस्था, शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय, इंजिनर्स जिमखान, सिंचन व्यवस्थापन आणि मुख्यत्वे म्हणजे पाणी वापर संस्था, पाणी वापर संस्था बाबतचे प्रशिक्षण, जलजागृती आदी कामाविषयांचे संदर्भ या ग्रंथात पाहावयास मिळतात..

सदर ग्रंथाचे लेखक अभियंता लक्ष्मीकांत वाघावकर हे आजही आपल्या सेवानिवृत्तनंतर वयाच्या पंच्याहत्तरीत पाणी वापर संस्था सक्षम व्हाव्यात म्हणून सक्रिय असून एक ध्येयासक्त अभियंता, व्याख्याता, कार्यकर्ता, मार्गदर्शक, लेखक म्हणून ते बहुमूल्य योगदान देताना दिसून येतात..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: