वाशीम पंचायत समितीच्या तांत्रिक अधिकारी (कंत्राटी) याला लाच मागणे चांगलेच भोवले असून वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोस्ट वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विजय यादव राऊत वय 33 वर्षे रा.वाशिम असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
दि.07/06/2023 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान यातील 27 वर्षीय तक्रारदार यांना त्यांचे वडीलाचे नावाने रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2022-23 मध्ये मंजूर झालेल्या विहीरीचे पुर्ण शेवटपर्यंत अनुदान देण्याकरिता 30,000/-₹ लाचेची मागणी करून विहीर खोदकामाचे पहिल्या टप्प्याचे अनुदान तक्रारदार यांचे वडीलांच्या खात्यात जमा करण्याकरिता तक्रारदाराकडून 5000/-₹ लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. दि.8/06/2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी ईतर लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्विकारली नाही वरून ईलोसे यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोस्ट वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶सक्षम अधिकारी – मा.जिल्हाधिकारी वाशिम
▶️ सापळा व तपास अधिकारी
श्री.गजानन शेळके
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
▶️ सापळा कार्यवाही पथक-
पोहवा नितीन टवलारकर, विनोद अवगळे विनोद मार्कंडे , पोलीस नाईक योगेश खोटे, रवी घरत
मार्गदर्शन –
▶१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.