Saturday, July 13, 2024
spot_img
HomeBreaking NewsTeam India Victory March : टीम इंडियाच्या विजययात्रेत जमलेली गर्दी पाहून थक्क...

Team India Victory March : टीम इंडियाच्या विजययात्रेत जमलेली गर्दी पाहून थक्क व्हाल…BCCI ने शेयर केला ड्रोन व्हिडिओ

Team India Victory March : T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावून परतलेल्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरू झाली आहे. जणू टीम इंडियाच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरली आहे. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी आहे. ही अडीच किलोमीटरची विजयी पदयात्रा नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचेल. या विश्वविजेत्या खेळाडूंचा बीसीसीआय वानखेडे स्टेडियमवर सन्मान करणार आहे. आज सकाळी टीम इंडिया नवी दिल्लीत पोहोचली होती. जिथे संघाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता मुंबईत मुसळधार पाऊस असूनही चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली आहे.

खुल्या बसमध्ये विजयी पदयात्रा काढणाऱ्या भारतीय संघाचे क्रिकेट चाहते जल्लोषात स्वागत करत आहेत. विराट कोहलीने बसमध्ये ट्रॉफी दाखवतांना चाहत्यांचे नियंत्रण सुटले. टीमचा जयजयकार करणाऱ्या घोषणांसोबतच लोक हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत. चाहत्यांच्या गर्दीमुळे बस चालवणे कठीण होत आहे.

BCCI ने शेयर केला ड्रोन व्हिडिओ
BCCI ने आपल्या अधिकृत X अकाउंटवर भारतीय संघाच्या या विजय मिरवणुकीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: