Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसागवान तस्कर पुष्पाला वन विभागाकडून अटक...

सागवान तस्कर पुष्पाला वन विभागाकडून अटक…

सागवान तस्कर पुष्पा ला वन विभागाकडून अटक वन विभागाच्यां रेड दरम्यान साहित्य. व सगवान फर्निचर जप्त. मशीन जप्त

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रातील दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी भौरद येथील जंगलामध्ये झालेल्या अवैद्य वृक्षतोड संबंधी चौकशी करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पांगरखेड ता. मेहकर जि. बुलढाणा येथील फर्निचर दुकानावर रेड करून तपासणी केली असता अवैद्य वृक्षतोड केलेल्या मालापासून पलंग, मंदिर, चौकट बनवताना आरोपी नामे अनिकेत मूलचंद जाधव रा. विश्वि तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यास अटक करण्यात आली.

आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) अ, ड, ई फ, ह, (1-ए) ए -बी, 52, 55, 61(अ),64, 65(अ) नुसार वन गुन्हा जारी करण्यात आला. आरोपीने गत तीन वर्षापासून भौरद, विष्वी, वाडी, जमुना, राजगड येथील जंगलातून सागवान वृक्ष कटाई व तोड करून त्यापासून फर्निचर बनवून विकत असल्याचे चौकशी दरम्यान कबूल केले.

यावेळी आरोपीकडून फर्निचर बनवण्याचे साहित्य, फर्निचर रंधा मशीन व एकूण 84 चौकट लहान मोठे सागवान नग असा एकूण अंदाजे एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी न्यायालय पातुर येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वन कोठडी सुनावली.

सदरील कार्यवाही अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री के आर अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक एस ए वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण, वनपाल पिंपळडोळी श डी एम इंगळे, वनरक्षक संदीप आलाट, बाळासाहेब थोरात, लखन खोकड, सतीश साळवे, कु अडोळे, कु वडजे, प्रशांत डोंबळे व इतर वन कर्मचारी यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी एम इंगळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: